वाघा-अटारी बॉर्डरवर यावर्षी 'बिटिंग रिट्रीट' होणार नाही

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 18 जानेवारी 2021

26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाला दरवर्षीप्रमाणे वाघा-अटारी सीमेवर कोणताही बिटिंग रिट्रीट सोहळा होणार नाही, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) आज दिली. 

वाघा-अटारी :  26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाला दरवर्षीप्रमाणे वाघा-अटारी सीमेवर कोणताही बिटिंग रिट्रीट सोहळा होणार नाही, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) आज दिली. 

दरवर्षी प्रजासत्ताक दिनी हा बिटिंग रिट्रीट सोहळा पहण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात.  बीएसएफच्या सूत्रांनी सांगितले की, 7 मार्च 2020 पासून कोरोनाची साथ पसरली आहे. कोरोनाची  पार्श्वभूमी पाहता यावर्षी हा सोहळा रद्द करण्यात आला आहे.

वाघ-अटारी सीमेवर दरवर्षी होणारा  बिटिंग रिट्रीट सोहळ्याची सुरूवात 1959 मध्ये झाली होती. कोरोनाविषाणूच्या निर्बंधामुळे कोणालाही येथे येण्याची परवानगी दिली जाणार नाही. भारतातर्फे दररोजच्या वेळापत्रकानुसार ध्वजांकन केले जाईल. वाघ-अटारी सीमेवर दरवर्षी होणारा  बिटिंग रिट्रीट सोहळा हा सर्वांच्या औत्सुक्यचा विषय असतो.

सुप्रिम कोर्टाचा मोठा निर्णय : प्रजासत्ताक दिनी निघणाऱ्या शेतकरी ट्रॅक्टर मार्चचा निर्णय दिल्ली पोलिसांनी घ्यावा

 

संबंधित बातम्या