केरळमध्ये डाव्यांवर ‘अविश्‍वास’

पीटीआय
मंगळवार, 25 ऑगस्ट 2020

केरळमधील सोने तस्करीप्रकरणी थेट राज्य सरकारवरच आरोप होऊ लागल्याने काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ आघाडीने आज पी. विजयन यांच्या नेतृत्वाखालील डाव्या सरकारविरोधात अविश्‍वास ठराव सादर केला आहे. 

तिरूअनंत पुरम: केरळमधील सोने तस्करीप्रकरणी थेट राज्य सरकारवरच आरोप होऊ लागल्याने काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ आघाडीने आज पी. विजयन यांच्या नेतृत्वाखालील डाव्या सरकारविरोधात अविश्‍वास ठराव सादर केला आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते व्ही. साथीशन यांनी हा ठराव सादर केला असून मुख्यमंत्र्यांचे कार्यालय सध्या सोने तस्करांच्या ताब्यात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

केरळमध्ये तब्बल पंधरा वर्षांनंतर एखाद्या सरकारविरोधात अविश्‍वास ठराव सादर करण्यात आला आहे. याआधी २००५ मध्ये ओमन चंडी यांच्या सरकारविरोधात अविश्‍वास ठराव मांडला होता. एका गृहनिर्माण प्रकल्पाच्या उभारणीमध्येही कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.

संबंधित बातम्या