'रेमडेसिव्हिर' बाबत कोणताही पुरावा नाही- WHO 

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 13 एप्रिल 2021

रेमडेसीव्हीर इंजेक्शन कोरोनावर परिणामकारक असल्याचा कोणताही पुरावा नाही असे म्हटले आहे.

देशात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना महाराष्ट्रसह इतर राज्यांमध्ये रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिव्हीर इंजेक्शन मिळवण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. एकिकडे रेमडेसीव्हीर इंजेक्शनची मागणी वाढत असताना जागतिक आरोग्य संघटनेनं या इंजेक्शनबद्दल मोठी माहिती दिली आहे. रेमडेसीव्हीर इंजेक्शन कोरोनावर परिणामकारक असल्याचा कोणताही पुरावा नाही असे म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सोमय्या स्वामीनाथन आणि डॉ. मारिया वॅन केरखोव यांनी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये ही माहिती दिली आहे. अलिकडेच करण्यात आलेल्या पाच चाचण्यांमधून हे समोर आलं आहे की, कोरोनामुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी आणि व्हेंटिलेशनमध्ये घट करण्यामध्ये रेमडेसीव्हीरच्या वापरामुळे कोणतीही मदत होत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. (No evidence of remedivisir  WHO)

कोरोनाचा विक्रमी उच्चांक; एक दिवसांत 1.68 लाख नव्या रुग्णांची नोंद 

रेमडेसीव्हीरच्या उपयुक्तेबाबत पाच वैद्यकीय चाचण्या करण्य़ात आल्या आहेत. या चाचण्यांच्या पुराव्याचा संदर्भ देत स्वामीनाथन म्हणाल्या, ‘’पाच वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. त्यामधून हाती आलेल्या पुराव्यानुसार असं दिसून येत आहे की, रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या रुग्णाला रेमडेसीव्हीर दिल्यानंतर मृत्यूदरात कोणत्याही प्रकारची घट झाली नाही. ना रुग्णांच्या रुग्णालयात उपचार करण्याच्या कालावधीमध्ये घट झाली. त्याचबरोबर आजारांवर रेमडेसीवीर परिणामकारक असल्याचं दिसून आलं नाही,’’ अशी माहीती त्यांनी दिली आहे.

सध्या रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांवर रेमडेसीव्हीरच्या उपचाराबद्दल सशर्त शिफारस केली आहे. पुराव्यांचा अभाव असला, तरी रुग्णांच्या प्रकृतीत काही प्रमाणात सुधारणा होते. मात्र सध्या रेमडेसीव्हीरच्या वैद्यकीय चाचण्या सुरु असून त्याच्यावर आमचं लक्ष आहे, असं डॉ. मारिया म्हणाल्या.

संबंधित बातम्या