कृषी कर्जांना व्याज माफी नाही

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात जाहीर केलेल्या व्याजावरील व्याज माफ करण्याच्या निर्णयात कृषी आणि कृषीपूरक व्यवसायांसाठी घेतलेल्या कर्जाचा समावेश नाही, असे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने आज स्पष्ट केले.

नवी दिल्ली  : केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात जाहीर केलेल्या व्याजावरील व्याज माफ करण्याच्या निर्णयात कृषी आणि कृषीपूरक व्यवसायांसाठी घेतलेल्या कर्जाचा समावेश नाही, असे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने आज स्पष्ट केले. तसेच, २९ फेब्रुवारीपर्यंतचे क्रेडिट कार्डवरील थकीत रक्कम गृहित धरणार असल्याचे मंत्रालयाने सांगितले आहे.

 केंद्राने गेल्या आठवड्यात घेतलेल्या निर्णयाबाबत असलेल्या शंकांचे अर्थ मंत्रालयाने निवेदनाद्वारे निरसन केले आहे. पीक आणि ट्रॅक्टर कर्जाचा कृषी कर्जात समावेश होतो. या योजनेसाठी निश्‍चित केलेल्या आठ प्रकारच्या कर्जांमध्ये कृषी कर्जाचा समावेश होत नाही, असे निवेदनात म्हटले आहे. क्रेडिट कार्डवरील कर्जाच्या सवलतीसाठी संबंधित कंपनीने कर्जदाराला दिलेला व्याज दर यावर अवलंबून राहणार आ

संबंधित बातम्या