काश्‍मीरमध्ये यंदा ‘हुतात्मा दिन ’नाही

PTI
मंगळवार, 14 जुलै 2020

नव्या बदलानुसार १३ जुलै आणि ५ डिसेंबर रोजीच्या काश्‍मीरमधील सार्वजनिक सुटी रद्द करण्यात आली.

श्रीनगर

जम्मू काश्‍मीरच्या इतिहासात यंदा प्रथमच १३ जुलै रोजी हुतात्मा दिनानिमित्त कोणताही सरकारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले नव्हते. जम्मू काश्‍मीरचे तत्कालिन पंतप्रधान शेख मोहंमद अब्दुल्ला यांनी १३ जुलै १९३१ रोजी डोग्रा शासनकर्त्याविरुद्ध बंड करताना मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ हुतात्मा दिवस जाहीर केला होता. तत्कालिन शासनकर्ते महाराजा हरिसिंह यांच्याविरोधात उठाव करणारे २२ जण मारले गेले होते.
गेल्यावर्षी ५ ऑगस्ट रोजी कलम ३७० हटवताना केंद्र सरकारने केंद्रशासित जम्मू आणि काश्‍मीरसाठी नवीन सरकारी सुट्ट्यांचे गॅझेट जाहीर केले होते. नव्या बदलानुसार १३ जुलै आणि ५ डिसेंबर रोजीच्या काश्‍मीरमधील सार्वजनिक सुटी रद्द करण्यात आली. एरव्ही सुटी रद्द करण्यापूर्वी १३ जुलै रोजी सरकारी कार्यक्रमाबरोबरच राज्यातील नेते श्रद्धांजली वाहण्यासाठी दफनभूमी येथे जात असत. यादरम्यान, काश्‍मीरमध्ये कडक लॉकडाउन असल्याने कोणताही नेता दफनभूमी येथे श्रद्धांजली वाहण्यासाठी जावू शकला नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले. फुटिरवादी हुर्रियतचा नेता मिरवाइज उमर फारुख याने बंदचे आवाहन केले होते. तर नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांनी हुतात्मांच्या दफनविधीला भेट देण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली.

संपादन - अवित बगळे

संबंधित बातम्या