पैशाविना बापाची दैना, रुग्णवाहिकेसाठी नव्हते पैसे; बसमधूनच नेला 5 महिन्याच्या चिमुकलीचा मृतदेह

पश्चिम बंगालच्या उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील घटना
No Money For Ambulance | West Bengal Father
No Money For Ambulance | West Bengal Father Dainik Gomantak

No Money For Ambulance in West Bengal: रूग्णवाहिकेला द्यायला पैसे नसल्याने पिशवीत घालून बसमधून पाच महिन्याच्या मुलीचा मृतदेह नेल्याची घटना घडली आहे. पश्चिम बंगालमधील (West Bengal) उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातून माणुसकीसाठी लाजिरवाणी अशी ही घटना समोर आली आहे. या हतबल बापाचे फोटोज सोशल मीडियातून व्हायरल झाले आहेत.

No Money For Ambulance | West Bengal Father
Indigo Flight: महिला क्रू मेंबरचा विनयभंग केल्याप्रकरणी अमृतसरमध्ये एकाला अटक

पश्चिम बंगालमधील रायगंज शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान या 5 महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. या मुलीचे वडील असीम देवशर्मा यांनी बाळाचा मृतदेह घेऊन जाण्यासाठी रूग्णवाहिकेला विचारले. पण त्यासाठी 8 हजार रूपये लागतील, असे सांगण्यात आले.

एवढे पैसे त्यांच्याकडे नव्हे. अखेर हतबल झालेल्या शर्मा यांनी बाळाचा मृतदेह पिशवित घातला आणि बसमधूनच गाव गाठले.

रायगंजपासून शर्मा यांचे गाव डांगीपारा हे गाव 90 किलोमीटर दूर आहे. असीम यांना जुळी मुले झाली होती. गुरुवारी अचानक जुळ्यांपैकी एका मुलीची प्रकृती बिघडली.

त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्यांनी मुलीला आधी कालियागंज आणि नंतर रायगंज मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल केले होते. त्यांची पत्नी एका बाळासह पत्नी घरी गेली. पण दुसऱ्या बाळाची प्रकृती प्रकृती बिघडल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते.

शनिवारी रात्री मुलीची तब्येत आणखी खालावली आणि त्यातच बाळाचा मृत्यू झाला.

No Money For Ambulance | West Bengal Father
Belgaum Airport Flights: गोव्यात विमानाने येणाऱ्या प्रवाशांना पर्यायी मार्ग उपलब्ध; बेळगावला सुरू होतेय थेट विमानसेवा

असीम यांनी सांगितले की, मुलाला घरी घेऊन जाण्यासाठी मी रुग्णवाहिकेतील व्यक्तीकडे गेलो. पण त्याने आठ हजार रुपये मागितले. मुलांच्या उपचारासाठी मी आधीच 16 हजार रुपये दिले होते. त्याला पैसे कमी करण्याची विनंती केली, पण त्याने ऐकले नाही.

मग मी पिशवीतून मृतदेह न्यायचे ठरवले. बसमधून ती पिशवीतून मृतदेह घेऊन कालियागंज येथील विवेकानंद चौकापर्यंत पोहोचलो. तिथे काही लोकांकडे मदत मागितली. तेव्हा तेथील लोकांनी माझ्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. मग त्यातून मृतदेह घेऊन गावी पोहचलो.

दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष सुकांता मजुमदार यांनी असीम यांचे फोटो सोशल मीडियातून शेअर केले आहेत. या फोटोमध्ये दिसणाऱ्या काळ्या पिशवीत मुलाचा मृतदेह होता. असीम देव शर्मा यांचा व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com