ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आरटीओ कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही;वाचा नवीन मार्गदर्शक सूचना

driving_licence
driving_licence

नवी दिल्ली: रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसन्स जारी करण्यासाठी आणि नूतनीकरणासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. या नव्या नियमानुसार आता  लर्निंग लायसन्स (LL)  मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया म्हणजेच अर्जापासून ते छपाईपर्यंतची प्रक्रिया आता ऑनलाईन केली जाणार आहे. तसेच, वैद्यकीय प्रमाणपत्रे, लर्निंग लायसन्स, ड्रायव्हिंग लायसन्सच्या (DL) नूतनीकरणासाठी इलेक्ट्रॉनिक प्रमाणपत्रे  वापरली जाऊ शकतात.(No need to go to RTO office for driving license; read new guidelines)

या मार्गदर्शक सूचनांद्वारे नवीन वाहनांच्या नोंदणीची प्रक्रिया सुलभ करण्याचा उद्देश आहे, तसेच नोंदणी प्रमाणपत्र, लायसन्स नूतनीकरण आता 60 दिवस अगोदर करता येईल तर तात्पुरत्या नोंदणीची मुदत 1 महिन्यावरून 6 महिन्यांपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्याचबरोबर सरकारने आता लर्निंग लायसन्स प्रक्रियेत बदल केले आहेत. त्यानूसार आता परवाना चाचणीसाठी आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. तुम्ही घर बसल्या परिक्षा देऊ शकता.रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेने सध्या चालू असलेल्या कोरोना साथीमुळे, वाहनचालक परवाना (DL), नोंदणी प्रमाणपत्र (RC), वाहन परमीट यासारख्या  मोटार वाहन कागदपत्रांची वैधता वाढविली आहे.

मंत्रालयाने एका परिपत्रकात म्हटले आहे की, देशभरात कोरोनोचा प्रसार रोखण्याच्या अटींमुळे आणि  सद्य परिस्थिती लक्षात घेता वरील सर्व कागदपत्रांची वैधता ज्यांची मुदत वाढविणे शक्य नाही.परंतु जे लायसन्स किंवा कागदपत्रे लॉकडाउनमुळे मंजूर झालेली नाही, जी 1 फेब्रुवारी 2020 रोजी कालबाह्य झाली किंवा 30 जून 2021 च्या अगोदर कालबाह्य झालीत, ती 30 जून 2021 पर्यंत वैध असल्याचे मानले जाईल. 


मंत्रालयाने पुढील अंमलबजावणी करताना अधिकार्‍यांना अशी कागदपत्रे 30 जून 2021 पर्यंत वैध ठेवण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे नागरिकांना वाहतुकीशी संबंधित सेवेंचा लाभ घेण्यास मदत होईल. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com