Noida News: राडा, राडा! मद्यधुंद अवस्थेत तरुणींनी गार्डसोबत केले गैरवर्तन

Noida Crime News: नोएडातील हायप्रोफाईल सोसायटीमधून धक्कादायक व्हिडिओ सातत्याने समोर येत आहे.
Girls
GirlsDainik Gomantak

Noida News: नोएडातील हायप्रोफाईल सोसायटीमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर येत आहे, ज्यामध्ये मुली गैरवर्तन करताना स्पष्टपणे दिसत आहेत. काल रात्री उशिरा नोएडातील एका हायप्रोफाईल सोसायटीत दोन मुलींनी दारु पिऊन गार्डसोबत शिवीगाळ आणि गैरवर्तन करुन गोंधळ घातला. रात्री उशिरापर्यंत मुलींचा हा हायव्होल्टेज ड्रामा सुरु होता.

पोलिसांनी दंड वसूल केला

पोलिसांकडून (Police) मिळालेल्या माहितीनुसार, नोएडाच्या पोलिस स्टेशन हद्दीतील होम्स 121 मध्ये जेव्हा गार्डने सोसायटीचे स्टिकर नसलेली कार गेटवर थांबवली तेव्हा, तिथे उपस्थित असलेल्या मुलींनी गोंधळ घालायला सुरुवात केली. मुली दारुच्या नशेत होत्या. त्यांनी तिथे उभ्या असलेल्या रक्षकांना शिवीगाळ केली. विशेष म्हणजे, शिवीगाळ करत एका गार्डची कॉलर पकडून त्यांनी त्याला मारहाण केली.

Girls
Jammu And Kashmir मध्ये दहशतवाद्यांचा मोठा कट फसला, सुरक्षा दलांनी जप्त केली स्फोटके

माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी दोन मुलींनी गार्डसोबत वाद घातला. त्याची दखल घेत पोलिसांनी मुलींची (Girls) वैद्यकीय तपासणी करुन तहरीरच्या आधारे अहवाल दाखल केला आहे.

सुरक्षा रक्षकावर हल्ला

महिनाभरापूर्वीही असेच एक प्रकरण समोर आले होते. जेव्हा नोएडाच्या सेक्टर-70 मध्ये राहणाऱ्या एका महिलेने सुरक्षा रक्षकाला मारहाण केली होती. गार्डने महिलेच्या गाडीवर स्टिकर लावून तिची अडवणूक केली होती. त्यानंतर महिलेने सुरक्षा रक्षकाशी वाद घालण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर महिलेने सुरक्षा रक्षकाला मारहाण केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. विशेष म्हणजे, या घटनेसंबंधीचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल झाला होता.

Girls
Jammu kashmir: स्वातंत्र्य दिनापूर्वी दहशतवाद्यांचा मोठा कट फसला, लष्कराच्या छावणीत घुसलेल्या 2 दहशतवाद्यांचा खात्मा

सुरक्षा रक्षकाला महिलेने शिवीगाळ केली

या घटनेच्या काही दिवसांपूर्वी नोएडामध्येच एका महिलेने सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ केली होती. नोएडाच्या जेपी विशटाउन सोसायटीमध्ये सुरक्षा रक्षकाने गेट उघडण्यास उशीर केला होता. यामुळे महिलेला राग आला आणि तिने त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महिलेने सुरक्षारक्षकाला मारहाण करण्याचाही प्रयत्न केला. वरील दोन घटनेप्रमाणे या ही घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर पोलिसांनी या महिलेवर कारवाई करत तिची कारागृहात रवानगी केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com