
Noida International Airport: आशियातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय विमानतळ भारतात बांधले जात आहे. येथे बांधकामे वेगाने सुरु आहेत. हे आंतरराष्ट्रीय विमानतळ यूपीच्या जेवरमध्ये बनवले जात आहे.
नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिस्टोफ स्नेलमन यांनी सांगितले की, विमानतळाची बिल्डिंग, रनवे आणि मुख्य टर्मिनल आकार घेत आहे. ही जागा आता विमानतळासारखी दिसू लागली आहे. 2024 च्या अखेरीस विमानतळावरुन (Airport) पहिले विमान उड्डाण केले जाईल अशी अपेक्षा आहे.
त्यापूर्वी, नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ तयार होणे अपेक्षित आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून येथील बांधकाम सुरु आहे. साईटवर सुमारे 2500 कर्मचारी (Employees) कार्यरत आहेत. येथे सर्व आधुनिक सुविधा असतील, जाणून घेऊया याबद्दल आणखी काही...
मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिस्टोफ श्नेलमन म्हणाले की, साइटवरील संरचना आकार घेत आहेत. बांधकामाचे काम वेगाने सुरु आहे. येत्या काही महिन्यांत डझनभर इमारती तयार होतील. यामध्ये एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवर्स, पॅसेंजर टर्मिनल्स, सीवेज, वॉटर ट्रीटमेंट प्लांट आणि पॉवर उपकेंद्रांचा समावेश आहे.
क्रिस्टोफ श्नेलमन म्हणाले की, जगभरातील विमान कंपन्या नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये रस घेत आहेत. धावपट्टी बनवणे हे अत्यंत अवघड आणि तांत्रिक काम आहे. आशियातील सर्वात मोठ्या विमानतळावर 300 मीटर लांब प्रवासी टर्मिनल असेल. याशिवाय, धावपट्टीची लांबी 4 हजार मीटर आणि रुंदी 45 मीटर असेल.
क्रिस्टोफ श्नेलमन पुढे म्हणाले की, धावपट्टी बनवणे म्हणजे अनेक थरांची पेस्ट्री बनवण्यासारखे आहे. येथे कॉम्पॅक्शन आणि लेअरिंगचे काम सुरु झाले आहे. संपूर्ण धावपट्टीवर अनेक वेळा लेअरिंग केले जाईल. हे सुमारे 1 वर्षासाठी केले जाईल. धावपट्टी हा विमानतळाच्या महत्त्वाच्या भागांपैकी एक आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी पुढे म्हणाले की, नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत अनेक विमान कंपन्यांशी चर्चा सुरु आहे. येथील टर्मिनल इमारतीचा आकार 1 लाख चौरस मीटर असेल. नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाची प्रवासी क्षमता प्रतिवर्ष 1 कोटी 20 लाख असेल.
विशेष म्हणजे, नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे बांधकाम तीन टप्प्यात पूर्ण केले जाणार आहे. ते सुमारे 5 हजार हेक्टर जमिनीवर बांधून तयार केले जाणार आहे. झुरिच एअरपोर्ट इंटरनॅशनल एजी त्याच्या बांधकामासाठी जबाबदार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.