कुटुंबाबाहेरील अध्यक्षासाठी प्रियांका गांधी-वद्रा अनुकूल

.
गुरुवार, 20 ऑगस्ट 2020

‘इंडिया टुमारो’ पुस्तकातील दावा; राहुल यांच्या वक्तव्याचे समर्थन

नवी दिल्ली, ता. १९ : काँग्रेसची धुरा गांधी घराण्याव्यतिरिक्त अन्य व्यक्तीकडे सोपविण्यास आणि त्यांच्‍या नेतृत्वाखाली पक्षाचे काम करण्यास काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वद्रा यांनी तयारी दाखविल्याचा दावा ‘इंडिया टुमारो ः कन्व्हरसेशन्स विथ द नेस्ट जनरेशन ऑफ पॉलिटिकल लिडर्स’ या पुस्तकात केला आहे.

प्रदीप छिब्बर व हर्ष शहा यांनी हे पुस्तक लिहिले असून यात गांधी घराण्यासह देशातील सर्वांत जुना पक्ष असलेल्या काँग्रेसबद्दल रोचक माहिती दिली आहे. गेल्या वर्षी झालेल्या सर्वसाधारण निवडणुकांच्या आधी प्रियांका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गांधी कुटुंबाव्यतिरिक्त काँग्रेस अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची तयारी प्रियांका यांनी दाखविल्याचा दावा केला आहे. पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदी गांधी घराण्याच्या बाहेरील व्यक्तीची नियुक्ती केली पाहिजे, असे वक्तव्य केले होते. याचे समर्थनही प्रियांका गांधी यांनी केल्याचे पुस्तकात म्हटले आहे. तसेच पक्ष स्वतःचा मार्ग शोधेल, अशी अपेक्षाही त्यांनी केली. 

संबंधित बातम्या