'पंतप्रधान मोदींशी असलेल्या नात्याच्या प्रदर्शनाची गरज नाही'

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020

माझ्यामुळे पंतप्रधान नरेंद्न मोदी हे कोणत्याही अडचणीत सापडू नयेत अशी माझी इच्छा आहे. त्यांनी त्यांचा आघाडी धर्म पाळावा. नितीश कुमार यांच्या समाधानासाठी ते माझ्याविरोधात काहीही बालू शकतात. मोदी यांच्या विकास मंत्रासाठी मी कटिबद्ध आहे, असेही चिराग पासवान यांनी आवर्जून सांगितले. 

 पटना- भाजपने लोकजनशक्तीचे नेते चिराग पासवान यांच्यावर टीका केली असली तरी पासनाव यांनी मात्र मवाळ भूमिका घेत भाजपने केवळ आघाडी धर्माचे पालन केले असल्याचा दावा केला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेल्या संबंधांचे प्रदर्शन करण्याची गरज मला नाही, असेही त्यांनी रविवारी स्पष्ट केले. 

भाजप चिराग यांच्यावर नुकतीच टीका केली. त्यावर कोणतीही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त न करता चिराग यांनी भाजपची नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दला (जेडीयू) शी युती असल्याने त्यांनी अशी टीका करून आघाडी धर्माचे पालन केले असल्याचे सांगितले. नितीश यांच्यावर टीका करण्याची संधी मात्र त्यांनी सोडली नाही. नितीश हे ‘वाटा आणि राज्य करा’ या नीतीचे पालन करणारे नेते आहेत. 

अन्य एका ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, नितीश यांनी प्रचारात सर्व जोर पंतप्रधान आणि माझ्यातील अंतर दाखविण्यावर दिला आहे. मोदी यांच्याशी माझे कसे संबंध आहेत, हे मला जाहीरपणे करण्याची गरज नाही.जेव्हा वडील जेव्हा रुग्णालयात होते तेव्हापासून अंतिम प्रवासापर्यंत मोदींनी जे काही केले ते मी कधीही विसरू शकणार नाही. 

संबंधित बातम्या