ही  गिधाडसारखे काम करण्याची वेळ नाही;  दिल्ली उच्च न्यायालय 

दैनिक गोमंतक
मंगळवार, 27 एप्रिल 2021

नवी दिल्ली : ' शंभर रुपयांचे ऑक्सिजन सिलेंडर राज्यात लाखों रुपयांना विकले जात आहेत. ही  गिधाडसारखे काम करण्याची वेळ नाही, अशा शब्दांत  दिल्ली उच्च न्यायालयाने सेठ एअर या ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या कंपनीला चांगलेच फटकारले आहे.

नवी दिल्ली : ' शंभर रुपयांचे ऑक्सिजन सिलेंडर राज्यात लाखों रुपयांना विकले जात आहेत. ही  गिधाडसारखे काम करण्याची वेळ नाही, अशा शब्दांत  दिल्ली उच्च न्यायालयाने सेठ एअर या ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या कंपनीला चांगलेच फटकारले आहे. तसेच दिल्लीतील केजरीवाल सारकरवरही निशाण साधला आहे. तुमच्याकडे कारवाई करण्याचे अधिकार आहेत. जे ऑक्सिजनचा कला बाजार करत आहेत त्यांचे ऑक्सिजन प्लांटस अधिग्रहीत करा, असे आदेशही दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल सरकारला दिले आहेत.  यावर दिल्लीच्या मुख्य सचिवांनी माहिती याबाबत माहिती दिली आहे. दिल्लीत आलेल्या सर्व ऑक्सिजन टँकरचा तपशील मागविला गेला आहे. त्याआधारे ऑक्सिजनचा कोटा तीन दिवसांसाठी ठरविला जाईल. अशी माहिती केजरीवाल सरकारने दिली आहे. (This is not the time to act like a vulture; Delhi High Court) 

''कोरोना विरोधातील लढाई 'आम्ही विरुध्द तुम्ही' नसून '...

दरम्यान, दिल्लीतील  खासगीरुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. याबाबत न्यायालयाने हस्तक्षेप करण्या बाबत दिल्ली उच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी झाली. दिल्लीतील खासगी रुग्णालयांनी रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध नसल्याचे सांगत कोर्टाकडून हस्तक्षेपाची मागणी केली. हायकोर्टाने सरकारला जाब विचारला तर ऑक्सिजन वाटपावरुन आज संध्याकाळपर्यंत हा आदेश संमत होईल असे दिल्ली सरकारने म्हटले आहे. यामध्ये ऑक्सिजन पुरवणाऱ्या  रुग्णालयांना त्याना ऑक्सिजनचा पुरवठा  कुतून केला जात आहे, याबाबत माहिती दिली जाईल, असेही दिल्ली सरकारने म्हटले आहे. 

नर्स-डॉक्टर्सचा काळा बाजार! 25 रुपयांच्या नकली 'रेमडीसीव्हीर'ची...

दिल्ली उच्च न्यायालयाने ऑक्सिजन रिफाईलर्स पाच कंपन्यांविरूद्ध अवमानना नोटीस बजावली आहे. हायकोर्टाच्या आदेशानंतरही काल या कंपन्या सुनावणीदरम्यान हजर नव्हत्या.  ऑक्सिजन पुरवठा करणार्‍या कंपन्यांनी कोणत्या रुग्णालयाला ऑक्सिजन पुरवठा करायचं याबाबत आम्ही कधीही सांगणार नाही, पण तुम्ही रुग्णालयांना ऑक्सिजन का पुरवत नाही? तुम्ही आम्हाला मूर्ख समजता का? अशा शब्दांत कोर्टाने सेठ एअरला चांगलेच फटकारले आहे. याशिवाय, जर ऑक्सिजनचा काळा बाजार केलं तर आम्ही दिल्ली सरकारला सेठ एअर ताब्यात घेण्याचे आदेश देऊ, असं इशाराही न्यायालयाने दिला आहे. 

संबंधित बातम्या