आता गाडी चालवताना कॉल घेणे आणि मेजेसला उत्तर देणे झाले सोपे; गुगलने आणले नवे फीचर 

दैनिक गोमंतक
सोमवार, 19 एप्रिल 2021

भारतात मोठ्या प्रमाणात रस्ते अपघात होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकदा गाडी चालवताना मोबाइलवर बोलणे, मेसेज करणे किंवा मोबाइल पाहणे या गोष्टी आपघातचे कारण बनतात. मोबाईलवर बोलताना झालेल्या आपघतामुळे अनेकांनी आपले जीव गमावल्याच्या अनेक घटना आपण पहिल्या आहेत.

भारतात मोठ्या प्रमाणात रस्ते अपघात होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकदा गाडी चालवताना मोबाइलवर बोलणे, मेसेज करणे किंवा मोबाइल पाहणे या गोष्टी आपघातचे कारण बनतात. मोबाईलवर बोलताना झालेल्या आपघतामुळे अनेकांनी आपले जीव गमावल्याच्या अनेक घटना आपण पहिल्या आहेत. मात्र आता वाहन चालविताना एखाद्याला मेसेज करणे किंवा कॉल करणे खूप सोपे झाले आहे. याचे कारण म्हणजे गूगलने एक असे फीचर भारतात लॉन्च केले आहे. ज्यामुळे कार चालविताना वापरकर्त्यांना कॉल घेणे आणि मेसेजला प्रत्युत्तर देणे जरा सोपे झाले आहे. (Now it's easier to take calls and answer messages while driving; New features introduced by Google) 

विमान कंपन्यांना हालगर्जीपणा भोवला; केजरीवाल सरकारची तडक कारवाई

गुगलच्या सपोर्ट पेजनुसार, गुगल अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी गुगल मॅपमध्ये गूगल असिस्टंट ड्रायव्हिंग मोड फीचर जारी करण्यात आले आहे. हे फीचर यापूर्वी केवळ अमेरिकेसाठी उपलब्ध होते. आता हे सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि भारत सारख्या इतर काही देशांमध्येही उपलब्ध करण्यात आले आहे.  मोबाइल युजर्स आवाजाद्वारे कॉल करू शकतात आणि  रिसीव करू शकतात. तसेच मेसेजही पाठवू शकतात. ड्रायव्हिंग मोडच्या माध्यमातून युजर्स नेव्हिगेशन स्क्रीन बंद न करता हे सर्व करू शकतील.  गूगल असिस्टंट युजर्सना नवीन संदेश वाचून दाखवेल त्यामुळे यांचे रस्त्यावरून लक्ष विचलित होणार नाही आणि फोनकडे पाहण्याचीही गरज भासणार नाही. अँड्रॉइड युजर्सना येणाऱ्या कॉलसाठी अलर्ट मिळेल आणि युजर्स केवळ आवाजाच्या माध्यमातून कॉल कट किंवा  रिसीव करू शकतील. 

मनमोहन सिंग यांचे नरेंद्र मोदींना पत्र; लसीबाबत दिल्या महत्त्वाच्या सूचना 

ड्राइव्हिंग मोडचा वापर या प्रमाणे करा:

ड्रायव्हिंग मोड वापरण्यास  खूप सोपे आहे. युजर्सना केवळ गुगल मॅप सुरू करून निश्चित ठिकाणी पोहचण्यासाठी  नेव्हिगेशन चालू करायचे आहे. मग ड्राईव्हिंग मोडचा एक पॉप स्क्रीनवर दिसेल आणि तो टॅप करायचा. यासाठी अजून एक मार्ग आहे.

यासाठी वापरकर्त्यांना त्यांच्या अँड्रॉईड फोनमधील असिस्टंट सेटिंग्जवर जावे लागेल किंवा 'हे गूगल, ओपन असिस्टंट सेटिंग्स' असे म्हणावे, यानंतर, 'ट्रान्सपोर्टेशन' वर जाऊन ड्रायव्हिंग मोड'चा ऑप्शन  निवडायचा आणि तो चालू करायचा. हे वैशिष्ट्य सध्या केवळ 4GB रॅमसह 9.0 किंवा त्यापेक्षा अधिक व्हर्जन असलेल्या एंड्रॉयड फोनसाठी उपलब्ध आहे.

संबंधित बातम्या