BBC Documentary: जेएनयूनंतर जामियामध्येही बीबीसी डॉक्युमेंटरीवरुन गोंधळ!

Jamia Millia Islamia University: जेएनयूनंतर जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात बीबीसी डॉक्युमेंट्रीच्या स्क्रीनिंगची घोषणा करण्यात आली आहे.
Jamia Millia Islamia University
Jamia Millia Islamia UniversityDainik Gomantak

Jamia Millia Islamia University: जेएनयूनंतर जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात बीबीसी डॉक्युमेंट्रीच्या स्क्रीनिंगची घोषणा करण्यात आली आहे. या माहितीपटाचे स्क्रिनिंग विद्यार्थी संघटना SFI तर्फे आज सायंकाळी 6 वाजता विद्यापीठात आयोजित करण्यात आले आहे.

त्याचवेळी, जामिया विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, प्रशासन हे होऊ देणार नाही. यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे, मात्र असे काही घडल्यास अशा विद्यार्थ्यांवर कडक कारवाई केली जाईल. जामिया विद्यापीठाबाहेर खबरदारी म्हणून सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दिल्ली पोलिस (Delhi Police) आणि रॅपिड अॅक्शन फोर्स तैनात करण्यात आले आहेत.

Jamia Millia Islamia University
BBC Documentary: पीएम मोदी अन् गुजरात दंगलीवरील BBC डॉक्युमेंट्रीवरुन JNU मध्ये कल्ला, वीजपुरवठा खंडित!

डॉक्युमेंटरी पाहणाऱ्या विद्यार्थ्यांवर दगडफेक

याआधी, काल रात्री BBC चा अँटी मोदी डॉक्युमेंट्री JNU मध्ये दाखवण्यात आली. विद्यापीठ प्रशासनाच्या नकारानंतरही मोदीविरोधी विद्यार्थी संघटनांनी मोबाईल फोन आणि लॅपटॉपवर डॉक्युमेंटरी पाहिली, त्यानंतर मध्यरात्री कॅम्पसमध्ये प्रचंड गोंधळ झाला. वादग्रस्त डॉक्युमेंट्री पाहणाऱ्या विद्यार्थ्यांवर दगडफेक करण्यात आली. जेएनयू स्टुडंट युनियनचा आरोप आहे की, डॉक्युमेंट्रीच्या स्क्रीनिंगवेळी एबीव्हीपीच्या लोकांनीच दगडफेक केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com