आता एक कोटी नवीन कुटुंबांना मिळणार विनामूल्य एलपीजी कनेक्शन; जाणून घ्या कसा करता येणार अर्ज

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 1 मार्च 2021

सरकार येत्या दोन वर्षात सरकार एक कोटीहून अधिक एलपीजी कनेक्शन देण्याची तयारी करीत आहे. पेट्रोलियम सचिव तरुण कपूर म्हणाले की, फक्त ओळख दस्तऐवज आणि स्थानिक निवासाचा पुरावा असल्यास कनेक्शन देण्याची योजना तयार आहे.

नवी दिल्ली: सरकार येत्या दोन वर्षात सरकार एक कोटीहून अधिक एलपीजी कनेक्शन देण्याची तयारी करीत आहे. पेट्रोलियम सचिव तरुण कपूर म्हणाले की, फक्त ओळख दस्तऐवज आणि स्थानिक निवासाचा पुरावा असल्यास कनेक्शन देण्याची योजना तयार आहे. केवळ 2021-22 या आर्थिक वर्षात सरकारने उज्ज्वला योजनेत 1 कोटी नवीन कुटुंबे जोडण्याविषयी बोलले होते. कपूर म्हणाले की, केवळ चार वर्षात गरीब महिलांच्या घरात आठ कोटी मोफत एलपीजी कनेक्शन देण्यात आले आणि देशात एलपीजी वापरकर्त्यांची संख्या जवळपास 29 कोटी झाली आहे. एक कोटी एलपीजी कनेक्शन कोणाला मिळणार?

दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) येणाऱ्या लोकांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत घरगुती एलपीजी कनेक्शन दिले जाते. उज्ज्वला योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील प्रत्येक कुटुंबाला सरकार 1600 रुपये आर्थिक मदत देते. 2011च्या जनगणनेनुसार बीपीएल (गरीब) गटात मोडणाऱ्या कुटुंबांना उज्ज्वला योजनेचा लाभ मिळू शकेल.

पेट्रोलियम सचिव तरुण कपूर यांनी म्हटले आहे की, ग्राहकांना त्यांच्या आसपासच्या तीन डीलर्सकडून रिफिल सिलिंडर मिळण्याचा पर्याय उपलब्ध होईल. पंतप्रधान उज्ज्वला योजना पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेशच्या बलिया येथून 1 मे 2016 रोजी सुरू केली होती. उज्ज्वला योजनेच्या अंमलबजावणीसाठी 8000 कोटी रूपये देण्यात आले होते.

उज्ज्वला योजनेचा लाभ कधी व कोणाला मिळणार

उज्ज्वला योजनेतील 2011 च्या जनगणनेनुसार बीपीएल (गरीब) गटात मोडणाऱ्या कुटुंबांना उज्ज्वला योजनेचा लाभ मिळू शकेल. केंद्र सरकारच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहकार्याने प्रधान मंत्री उज्ज्वला योजना राबविली जात आहे. पारंपारिकपणे, ग्रामीण भागात स्वयंपाक करण्यासाठी लाकूड आणि शेणाच्या गौऱ्या, गवत आणि पाने वापरली जातात. यातून निघणाऱ्या धुराचा महिलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

ISRO ने लॉन्च केलं या वर्षातलं पहिलं अवकाशयान; पंतप्रधान मोंदीचा फोटो अंतराळात पाठवला 

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी अर्ज कसा करावा?

बीपीएल कुटुंबातील कोणतीही महिला उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस कनेक्शन मिळविण्यासाठी अर्ज करू शकते. त्यासाठी तुम्हाला केवायसी फॉर्म भरावा लागेल आणि तो नजीकच्या एलपीजी केंद्रात जमा करावा लागेल. उज्ज्वला योजनेतील अर्जासाठी 2 पानांचा फॉर्म, आवश्यक कागदपत्रे, नाव, पत्ता, जन धन बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक इत्यादी आवश्यक आहे. अर्ज करताना आपल्याला 14.2 किलो सिलिंडर घ्यायचा आहे की 5 किलो हे देखील सांगावे लागेल. आपण उज्ज्वला योजनेचा अर्ज प्रधान मंत्री उज्ज्वला योजनेच्या वेबसाइटवरून डाउनलोड करू शकता. आपण नजीकच्या एलपीजी केंद्राकडून देखील अर्ज घेऊ शकता.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस 

संबंधित बातम्या