'आता गुन्हेगारांची काही खैर नाही' मध्य प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय!

मध्य प्रदेश(Madhya Pradesh) सरकार हे गुन्हेगारी (Crime)बाबतचे विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशमध्ये युपी(UP), बिहारनंतरची सर्वात मोठी गुन्हेगारी आहे.
'आता गुन्हेगारांची काही खैर नाही' मध्य प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय!
CourtDainik Gomantak

मध्य प्रदेश: वाढत्या गुन्हेगारीचे प्रमाण रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार (Central and State Governments)वेगवेगळे कायदे, शिक्षा यांची तरतूद करत असतात. परंतु गुन्हेगार एवढे सोकावलेले आहेत, की गुन्ह्यांचे प्रमाण काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाहीत.याउलट ते अधिकच वाढत आहे.

मध्य प्रदेश सरकार हे गुन्हे कमी करण्यासाठी नवीन कायदा (act)आणण्याच्या तयारीत आहे. गुन्हेगारांना चाप बसविण्यासाठी त्यांचा पैसा आणि संपत्ती गरीबांमध्ये वाटण्यात येणार आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले की, हा कायदा उत्तर प्रदेशच्या गँगस्टर अँक्टपेक्षाही जास्त कठोर असेल. गृह आणि कायदे विभाग एकत्रितपणे या विधेयकावर काम करत आहेत.

Court
International Tiger Day: मध्य प्रदेशमधील वाघांची जोडी गोव्यात येणार

या विधेयकामध्ये (Bill)अपराध्यांची सर्व संपत्ती जप्त केली जाईल. त्यानंतर ही संपत्ती जप्त करून गरीबांमध्ये वाटण्याची तरतूद यामध्ये करण्यात आली आहे. यासाठी गुन्ह्याची प्रकरणे वेळत निकाली काढण्याची गरज आहे. म्हणून यासाठी स्पेशल कोर्ट स्थापन केले जातील. त्याचबरोबर साक्षीदारांच्या सुरक्षेचीही काळजी घेण्यासाठी यामध्ये तरतूद केली जाणार आहे. या गुन्हेगारांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या मदत करणाऱ्यांना देखील शिक्षा होणार आहे. अश्या प्रकारची तरतूद ही या विधेयकामध्ये केली जाणार आहे.

मध्य प्रदेश सरकार हे गुन्हेगारी बाबतचे विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशमध्ये युपी, बिहारनंतरची सर्वात मोठी गुन्हेगारी आहे. उत्तर प्रदेशमध्ये काही महिन्यांपूर्वी एन्काऊंटर (Encounter)केलेला गुंड देखील मध्यप्रदेशमध्ये लपला होता. युपीला नेत असताना गाडी पलटली झाली आणि तो त्यावेळी पळून जात होता, म्हणून तिथेच त्याचा एन्काऊंटर करण्यात आला. त्याला पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर(police) गोळीबार केला होता. यात काही पोलिसांचा मृत्यू झाला होता.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com