आता राज्याच्या सरकारी बसेसमधून महिलांना करता येणार मोफत प्रवास; पंजाब सरकारची घोषणा 

दैनिक गोमंतक
बुधवार, 31 मार्च 2021

पंजाब सरकारने महिलांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. पंजाबच्या मंत्रिमंडळाने महिलांसाठी मोफत ट्रॅव्हल फॉर वुमेन्स योजनेस मान्यता दिली.

पंजाब सरकारने महिलांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. पंजाबच्या मंत्रिमंडळाने महिलांसाठी मोफत ट्रॅव्हल फॉर वुमेन्स योजनेस मान्यता दिली. त्यामुळे 1 एप्रिल म्हणजे उद्यापासून सरकारी बससेमधून महिलाना मोफत प्रवास करता येणार आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी मार्चच्या सुरूवातीस विधानसभेत ही घोषणा केली. मात्र बसमध्ये प्रवास करताना महिलांना आधार कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा इतर सरकारी प्रमाणपत्र दाखवावे लागेल. त्याचबरोबर व्हॉल्वो, एचव्हीएसी आणि सरकारच्या वातानुकूलित बसमध्ये मोफत सेवा मिळणार नाही. असेही सांगण्यात आले आहे. 

Farmer Protest: तीन सदस्यांच्या समितीने सर्वोच्च न्यायालयात बंद लिफाफ्यातुन...

राज्यातील महिला आणि मुलींच्या सक्षमीकरणाच्या सरकारच्या प्रयत्नातून ही योजना मंजूर केली अहगे.  या टप्प्यानंतर राज्यभरात 1.31 कोटीहून अधिक महिला आणि मुलींचा लाभ होईल, असा विश्वास कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी व्यक्त केला आहे.  2011च्या जनगणनेनुसार पंजाबची लोकसंख्या 2.77 कोटी आहे (पुरुष 1,46,39,465 आणि महिलांची संख्या 1,31,03,873). या योजनेस मंजुरी मिळाल्यानंतर आता महिलांना पंजाब सरकारच्या सरकारी बसमध्ये कुठेही जाण्यासाठी भाडे द्यावे लागणार नाही. या योजनेच्या मंजुरीबाबत मुख्यमंत्री कार्यालयाने (सीएमओ) बुधवारी मंत्रिमंडळाला माहिती दिली आहे. 

पंजाबचे अर्थमंत्री मनप्रीतसिंग बादल यांनी मार्च महिन्याच्या सुरुवातीला 2021-22 (बजेट 2021) साठी राज्याचे 1,68,015 कोटी रुपयांचे बजेट सादर केले. अर्थसंकल्पात, पंजाब सरकारने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पंजाबमधील महिलांना एक मोठी भेट दिली. राज्य सरकारच्या बसेसमध्ये महिलांसाठी प्रवास मोफत करण्याची घोषणा सरकारने केली होती.  विशेष म्हणजे राजधानी दिल्लीतही केजरीवाल सरकारच्या फ्री राइड योजनेंतर्गत महिला डीटीसी आणि क्लस्टर बसमध्ये मोफत प्रवास करीत आहेत.
 

संबंधित बातम्या