JEE Mains, NEET आणि UGC NET परीक्षेच्या तारखा जाहीर, पाहा वेळापत्रक

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने 2024 मध्ये होणाऱ्या देशातील प्रमुख परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत.
NTA JEE Mains NEET CUET UGC NET Exam 2024 Date
NTA JEE Mains NEET CUET UGC NET Exam 2024 DateDainik Gomantak

NTA JEE Mains NEET CUET UGC NET Exam 2024 Date: JEE मुख्य परीक्षा सत्र-1 जानेवारी-फेब्रुवारी 2024 मध्ये, सत्र-2 एप्रिल 2024 मध्ये तर, NEET UG आणि CUET UG परीक्षा मे 2024 मध्ये होणार आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने 2024 मध्ये होणाऱ्या देशातील प्रमुख परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. विद्यार्थी NTA च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन परीक्षेचे वेळापत्रक चेक करु शकतात.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) संयुक्त प्रवेश परीक्षा – मुख्य (JEE Main 2024), राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (NEET UG 2024), कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश परीक्षा (CUET UG आणि PG 2024) आणि इतर स्पर्धात्मक परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

एनटीए परीक्षेच्या कॅलेंडरनुसार, जेईई मेन 2024 परीक्षा दोन सत्रांमध्ये घेतली जाईल. सर्वात मोठी मानली जाणारी वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET UG 2024 ही 5 मे रोजी होणार आहे. अंतिम परीक्षेच्या तीन आठवड्यांत निकाल जाहीर केला जाईल.

NTA JEE Mains NEET CUET UGC NET Exam 2024 Date
टिळकांच्या आधीपासून गोव्यात साजरा होतोय सार्वजनिक गणेशोत्सव, 800 वर्षापूर्वीच्या 'पत्रीचा गणपती'ची कहाणी

संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) मुख्य परीक्षा 2024 मध्ये दोन सत्रांमध्ये घेतली जाईल. जेईई मेन 2024 चे पहिले सत्र जानेवारीमध्ये (24 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान) आणि दुसरे सत्र एप्रिलमध्ये (एप्रिल 1 आणि 15) नियोजित आहे. यानंतर, राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (NEET UG 2024) 5 मे रोजी लेखी पद्धतीने घेतली जाईल.

NTA ने अधिकृत परिपत्रकात NEET UG 2024 चे निकाल जून 2024 च्या दुसऱ्या आठवड्यात घोषित केले जातील, असे म्हटले आहे. दरम्यान, NTA द्वारे पदव्युत्तर कार्यक्रमांसाठी कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश परीक्षा (CUET PG) 11 मार्च ते 28 मार्च 2024 या कालावधीत घेतली जाईल.

त्यांचा निकालही अंतिम परीक्षेच्या तीन आठवड्यांत जाहीर केला जाईल. CUET UG, JEE Main, NEET UG च्या परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या असल्या तरी CUET UG परीक्षेच्या नोंदणीच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत.

असे आहे वेळापत्रक

JEE Main 2024 सत्र 1: 24 जानेवारी ते 1 फेब्रुवारी

JEE Main 2024 - सत्र 2: एप्रिल 1 ते 15, 2024

NEET UG 2024: 5 मे

CUET UG 2024: 15 ते 31 मे 2024

CUET PG 2024: 11 ते 28 मार्च 2024

UGC NET 2024 जून सत्र: 10 ते 21 जून 2024

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com