Space: भारतानं पुन्हा करुन दाखवलं... पृथ्वी-2 चे यशस्वी परिक्षण

Prithvi-2: अंतराळात शत्रूच्या सॅटेलाईटला उध्वस्त करण्यासाठी बनवलेले शक्ती मिसाईल पृथ्वी मिसाईल तंत्रज्ञानावर आधारित हे मिसाईल आहे.
Space
SpaceDainik Gomantak

Space: ओडीशामधील चांदीपूर येथील भारताच्या स्ट्रॅटीजिक फोर्स कमांडने इंटिग्रेटेड स्टेट रेंजवरुन पृथ्वी-२चे यशस्वी परिक्षण केले आहे. पृथ्वी -२ची मारक क्षमता आणि अचुकता लक्षात येण्यासाठी ही टेस्टींग रात्री केल्याची अधिकृत माहीती दिली आहे. नवीन भरती झालेल्या अधिकाऱ्यांना मिसाईल लॉचिंगचे ट्रेनिंग देण्यासाठी हे लॉंचिग केले आहे.

पृथ्वी -२ची मारक क्षमता 350 किलोमीटर आहे.त्याचबरोबर हे सिंगल स्टेज लिक्विड इंधन मिसाईल आहे.पृथ्वी मिसाईलवर 500 ते 1000 किलोग्रॅमची परमाणु हत्यारे लावण्याची व्यवस्था केली आहे. महत्वाचे म्हणजे, शत्रूच्या ॲंटी-बॅलेस्टिक मिसाईलच्या तंत्रज्ञानाला धोका देण्यात सक्षम आहे. 2019 पासून हे चौथे युजर नाइट ट्रायल होते. आनंदाची बाब म्हणजे प्रत्येकवेळी पृथ्वी -2चे यशस्वी प्रक्षेपण झाले आहे.

पृथ्वी-2 हे भारतातील आकाराने लहान आणि वजनाने हलके असणारे मिसाईल आहे.याचे वजन 4600 किलोमीटर असून 110 सेंटीमीटर व्यास असून 8.56 मीटर लांबी आहे. पृथ्वी-2 मिसाइल मध्ये हाय एक्सप्लोसिव, पेनेट्रेशन, क्लस्टर म्यूनिशन, फ्रॅगमेंटेशन, थर्मोबेरिक, केमिकल वेपन आणि टैक्टिकल न्यूक्लियर वेपन लाऊ शकतो . पृथ्वी-2 मिसाइल स्ट्रैप-डाउन इनर्शियल नॅव्हिगेशन सिस्टिमवर काम करते .

Space
Jaipur: 'माझं नाव लक्षात ठेवा'...भाजप खासदाराची डीएसपींवर अरेरावी, व्हिडिओ व्हायरल

पृथ्वी-2चे खरे नाव SS-250 असून ,भारतीय वायुसेनेसाठी बनवण्यात आले आहे. अंतराळात शत्रूच्या सॅटेलाईटला उध्वस्त करण्यासाठी बनवलेले शक्ती मिसाईल पृथ्वी मिसाईल तंत्रज्ञानावर आधारित हे मिसाईल आहे. दरम्यान, पृथ्वी-2 मिसाईलमुळे भारता( India )ला सक्षम करत असल्याचे म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com