Coronavrius: देशात मागील 5 दिवसात 2 लाख अ‍ॅक्टिव रुग्ण झाले कमी  

दैनिक गोमंतक
मंगळवार, 18 मे 2021

एकूण संसर्गजन्य लोकसंख्या 2.5 कोटीच्या जवळपास पोहोचली आहे.

कोरोना साथीच्या दुसर्‍या (Corona Second Wave) लाटेमधून देशातील बर्‍याच भागांना दिलासा मिळाला आहे. दक्षिण भारतातील काही राज्य वगळता उर्वरित राज्यांत नवीन रुग्ण  झपाट्याने कमी होत आहेत आणि अ‍ॅक्टिव रुग्णही त्या प्रमाणात कमी होत आहेत. गेल्या पाच दिवसांबद्दल बोलायचे झाले तर अ‍ॅक्टिव रुग्णांचा आकडा जवळपास दोन लाखांनी खाली आला आहे. त्याचबरोबर नव्या रुग्णांमध्येही एक लाखांची घट झाली आहे. सोमवारी सकाळी आठ वाजता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अद्ययावत आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 2,81,837 नवीन रुग्ण आढळून आले आहेत आणि अ‍ॅक्टिव रूग्णांची संख्या 35,12,674 वर आली आहे. तर पाच दिवसांपूर्वी 12 मे रोजी 3,,62,632 रुग्ण आढळले आणि 12 मेला देशात 37,06,.080 अ‍ॅक्टिव रुग्ण होते.(The number of active patients in the country has decreased by 2 lakh in the last 5 days)

शाहिद जमील यांच्या राजीनाम्यानंतर ओवीसींची मोदी सरकारवर टीका

मृतांची संख्या मात्र कमी होत नाहीये
मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या काळात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे, परंतु रोजच्या मृतांची संख्या कमी होत नाही ही चिंतेची बाब आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज सरासरी चार हजार लोक मरत आहेत. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये दैनंदिन रुग्ण सातत्याने कमी होत असले तरीही प्रमुख राज्यांमध्येही मृत्यूची संख्या कमी होत नाहीये.

कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली 
एकूण संसर्गजन्य लोकसंख्या 2.5 कोटीच्या जवळपास पोहोचली आहे. यापैकी जवळपास 2.12 कोटी रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत आणि 2.74 लाख लोकांचा बळी गेला आहे. रूग्णांचा कोरोनातून बरे होण्याचा दर वाढून 84.81 टक्के झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.10 टक्के आहे, जे गेल्या काही दिवसांपासून 1.09 टक्के स्थिर राहिले. सक्रीय रुग्णांचे प्रमाण एकूण 14.09 टक्के झाले आहे.

गोमूत्र कोरोनासाठी वरदान- खासदार प्रज्ञा ठाकूर

कर्नाटकमध्ये तीन महिन्यांत प्रथमच नवीन रूग्णांपेक्षा जास्त लोक बरे झाले
कर्नाटकसह दक्षिण भारत, केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमधील कोरोना रुग्ण कमी होत नाही. आंध्र प्रदेशात 24 हजाराहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून एकाच दिवसात इतकी प्रकरणे कधीच आढळली नव्हती. कर्नाटकात तीन महिन्यांत पहिल्यांदाच एका दिवसात नवीन रुग्णांपेक्षा (31,531) जास्त रुग्ण ( 36,475) बरे झाले आहेत.

 

 

संबंधित बातम्या