देशात कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या साडेतीनपटींनी अधिक

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 27 ऑगस्ट 2020

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार देशात सध्या सक्रिय रुग्णसंख्या ७,०७,२६७ आहे. एकूण ३२,३४,४७४ रुग्ण आहेत. मागच्या चोवीस तासांत ६३,१७३ लोक बरे झाले आहेत. रिकव्हरी रेट ७६.३० तर मृत्यूदर १.८४ टक्के आहे.

नवी दिल्ली: भारतात ‘कोविड-१९’ संसर्गाच्या एकूण संक्रमितांपैकी बरे होणाऱ्यांची संख्या २४,६७,७५८ वर पोचली असून सरकारच्या दाव्यानुसार जेवढे सक्रिय रुग्ण देशात सध्या आहेत, त्यापेक्षा ही संख्या तब्बल साडेतीन पटींनी जास्त आहे. देशातील कोरोनातून बरे होण्याचा दर (रिकव्हरी रेट) ७६ टक्‍क्‍यांहून जास्त झाला आहे. बुधवारी सकाळपर्यंत ५९,४४९ लोकांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. 

या संसर्गाचा सर्वांत मोठा फटका महाराष्ट्राला बसला असून राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या मृत्यू देशात सर्वाधिक आहेत. त्यापाठोपाठ आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली, पश्‍चिम बंगाल व बिहारमध्ये कोरोनाचा संसर्ग सर्वाधिक आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार देशात सध्या सक्रिय रुग्णसंख्या ७,०७,२६७ आहे. एकूण ३२,३४,४७४ रुग्ण आहेत. मागच्या चोवीस तासांत ६३,१७३ लोक बरे झाले आहेत. रिकव्हरी रेट ७६.३० तर मृत्यूदर १.८४ टक्के आहे. सकाळी ८ पर्यंतच्या चोवीस तासांत ६७,१५१ नवे रुग्ण आढळले तर १०५९ लोकांचा मृत्यू झाला. मृत्यू पावलेल्या ५९ हजारांहून जास्त रुग्णांपैकी ८७ टक्के रुग्ण ४५ वर्षांपुढील होते. ६० वर्षांपुढील मृतांचे प्रमाण ५१ टक्के आहे. २६ वर्षांखालील केवळ २ टक्के लोकांचाच कोरोनाने मृत्यू झाला आहे. 

दिल्लीतील दहा हजार खाटा रिकाम्या
दिल्लीत गेल्या ५५ दिवसांत घरातच विलगीकरणात राहणाऱ्यांपैकी एकाही कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झालेला नाही. दिल्ली सरकारच्या म्हणण्यानुसार कोरोना रुग्णालयांतील १० हजारांहून जास्त खाटा आजही रिकाम्या आहेत. पुढील एका आठवड्यात दरदिवशी ४० हजारांहून जास्त लोकांच्या चाचण्या करण्याचे लक्ष्य राज्य सरकारने समोर ठेवले आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या