कोविड-19 च्या सक्रीय रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक

Pib
बुधवार, 10 जून 2020

कोविड19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 किंवा 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे. https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf .

मुंबई,

गेल्या 24 तासांत देशभरात कोविड-19 चे 5,991 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 1,35,205,इतकी झाली आहे, तर उपचार घेत असलेल्या सक्रीय रुग्णांची संख्या 1,33,632 इतकी आहे. पहिल्यांदाच बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या, सक्रीय रुग्णांपेक्षा अधिक झाली आहे. देशातील रुग्ण बरे होण्याचा दर आता 48.88टक्के इतका झाला आहे.

तसेच, पहिल्यांदाच,आयसीएमआरने केलेल्या चाचण्यांची संख्या देखील 50 लाखांपेक्षा अधिक झाली आहे. आतापर्यंत आयसीएमआर ने 50,61,332 चाचण्या केल्या आहेत. गेल्या 24 तासांत आसीएमआरने 1,45,216 चाचण्या केल्या. संसर्गित व्यक्तीमध्ये कोविड विषाणूचा संसर्ग आहे का हे तपासण्यासाठीची चाचणी क्षमता आयसीएमआर ने सातत्याने वाढवत नेली आहे. सध्या देशभरात 590 सरकारी आणि 233 खाजगी, अशा एकूण 823 प्रयोगशाळांमध्ये कोविडची चाचणी केली जाते.

कोविड-19 चा प्रादुर्भाव अधिक असलेल्या मुंबई, अहमदाबाद, चेन्नई, कोलकाता, दिल्ली आणि बेंगरूळू या शहरांमध्ये राज्यातील आरोग्य विभागांना आणि महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांना सहाय्य, विशेषतः तांत्रिक मदत करण्यासाठी तसेच, सार्वजनिक आरोग्य उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

ही पथके, या सर्व शहरांमध्ये येत्या एक आठवड्यात भेट देतील आणि कोविड-19 विषयक सार्वजनिक आरोग्य सोयी-सुविधांचा आढावा घेतील. या संदर्भात केलेल्या कार्यवाहीचा दैनंदिन अहवाल ही पथके रोज राज्य आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पाठवतील. त्वरित हस्तक्षेप करण्यासारखी एखादी समस्या किंवा मुद्दा असल्यास त्याविषयी ही पथके माहिती देतील आणि त्यांची निरीक्षणे तसेच सूचनांचा अहवालही सादर करतील.

कोविड19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया येथे  भेट द्यावी : https://www.mohfw.gov.in/. आणि @MoHFW_INDIA

तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19@gov.in आणि इतर शंका/समस्यांसाठी - ncov2019@gov.in . आणि @CovidIndiaSeva

 

संबंधित बातम्या