बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ

pib
बुधवार, 8 जुलै 2020

सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांमध्ये समर्पित कोविड सुविधांचा विस्तार केल्यामुळे रूग्णांवर वेळेवर उपचार सुनिश्चित झाले आहेत.

नवी दिल्ली,

केंद्र आणि राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकार कोविड -19 च्या प्रभावी व्यवस्थापनासाठी "चाचणी, शोध  आणि उपचार" धोरणाचे अनुपालन करत आहे.

भारतात, कोविड -19 रुग्ण मोठ्या संख्येने असलेली राज्ये / केंद्रशासित प्रदेश बाधित रुग्णांची लवकर ओळख पटवणे आणि प्रभावी वैद्यकीय व्यवस्थापनावर आपले लक्ष केंद्रित करत आहेत जेणेकरून प्रति दहा लाख सक्रिय रुग्णांपेक्षा प्रति दहा लाख बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण जास्त असेल. यावरून असे दिसून येते कि एकूण कोविड बाधित रुग्णांची  संख्या जास्त असेलही मात्र रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही जलद गतीने वाढत आहे, त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या कमी आहे. यामुळे हे देखील सुनिश्चित केले आहे की कोविड आरोग्य सेवांवर ताण येणार नाही.

भारतात प्रति दहा लाख 315.8 रुग्ण बरे झाले आहेत तर देशात प्रति दहा लाख सक्रिय रुग्णांचे प्रमाण निम्न स्तरावर म्हणजेच 186.3.इतके आहे.

आरटी-पीसीआर चाचण्या, रॅपिड अँटीजेन टेस्टच्या सहाय्याने चाचण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्याच्या  केंद्रीय आरोग्य आणि  कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या निर्देशांचे राज्यांनी पालन केले ज्यामुळे बाधित रुग्णांची  लवकर ओळख पटवण्यास मदत झाली. राज्यांमध्ये आरोग्यविषयक पायाभूत सुविधा वाढल्यामुळे समर्पित कोविड रुग्णालये , कोविड आरोग्य सेवा केंद्र आणि कोविड केअर सेंटरसह वेगवेगळ्या आरोग्य सुविधांमध्ये बाधित रुग्ण विखुरले आहेत. याबरोबरच प्रभावी उपचारांद्वारे मृत्यू दर कमी राखणे शक्य झाले आहे. सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांमध्ये समर्पित कोविड सुविधांचा विस्तार केल्यामुळे रूग्णांवर वेळेवर उपचार सुनिश्चित झाले आहेत.

चाचणीसह, संपर्क शोध आणि घरोघरी  सर्वेक्षण विशेषतः प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये अधिक तीव्र केले आहे. राज्यांना विशेष सूचना करण्यात आली आहे की कमीतकमी 80%  नवीन बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांचे  72 तासांच्या आत विलगीकरण केले जावे.  ज्येष्ठ आणि वृद्ध व्यक्ती, इतर गंभीर आजार असलेल्या व्यक्ती ,  गर्भवती महिला आणि लहान मुलांसह उच्च धोका असलेल्या लोकांचा मागोवा घेण्यासाठी राज्यांनी अनेक मोबाइल अ‍ॅप्स विकसित केले आहेत. स्थानिक पातळीवर समुदाय, आशा कार्यकर्त्या आणि एएनएम यांच्या सहभागामुळे समाजात प्रभावी देखरेख  ठेवली गेली आहे.

कोविड19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी : https://www.mohfw.gov.in/   आणि @MoHFW_INDIA.

तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा:  technicalquery.covid19@gov.in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी-  ncov2019@gov.in  आणि @CovidIndiaSeva .

कोविड19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 or 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे

https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf  

संबंधित बातम्या