नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या जवानांचा आकडा 22 वर

दैनिक गोमंतक
रविवार, 4 एप्रिल 2021

शनिवारी नक्षलवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात पाच  जवान शहिद झाल्याची माहिती मिळाली होती, तर इतर काही जवान बेपत्ता असल्याचे सांगितले जात होते.

छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त बीजापुर जिल्हयात शनिवारी सैन्य आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. दुर्दैवाने या चकमकीत सुरक्षा यंत्रनेचे 22 जवान शहीद झाल्याची माहीती मिळते आहे.  या घटनेनंतर गावाच्या आजूबाजूच्या परिसरातून जवानांचे मृतदेह सापडले आहेत. नक्षलवाद्यांनी जवानांच्या मृतदेहांवरील कपडे आणि हत्यार सुद्धा चोरून नेल्याचे आढळून आले आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि केंद्रीय राखील पोलीस दलाचे (सीआरपीएफ) चे महासंचालक कुलदीप सिंग यांच्याशी चर्चा केल्याचे समजते आहे.  (Number of soldiers killed in clashes with Naxals rises to 22)

पश्चिम बंगालमधील अमित शहांच्या रोड शो नंतर सापडले बॉम्ब

शनिवारी नक्षलवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात पाच  जवान शहिद झाल्याची माहिती मिळाली होती, तर इतर काही जवान बेपत्ता असल्याचे सांगितले जात होते. त्यातच आज बीजापुर गावाच्या आजूबाजूच्या परिसरातून जवानांचे अजून मृतदेह आढळल्याची माहिती मिळते आहे. मृत जवानांच्या अंगावरील कपडे, बूट आणि शस्त्र देखील घेऊन गेल्याचे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून समजते आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याशी छत्तीसगड मध्ये घडलेल्या या घटनेबद्दल चर्चा केली तसेच गृहमंत्र्यांच्या आदेशावरून सीआरपीएफचे महासंचालक कुलदीप सिंग आज सकाळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी छत्तीसगडमध्ये दाखल झाले असल्याचे समजते आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) हे देखील आज संध्याकाळपर्यंत आसामहून छत्तीसगडला परतणार आहेत. दरम्यान या घटनेत जखमी झालेल्या 30 जवानांना बिजापूर आणि रायपूर येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. 

नक्षलविरोधी (Naxal) कारवाई दरम्यान सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाचा नक्षलवाद्यांशी सामना झाल्याची माहिती छत्तीसगडचे पोलिस महासंचालक डी एम अवस्थी यांनी शनिवारी दिली होती.  बंदी घातलेल्या माकप (माओवादी)चा म्होरक्या 'माडवी हिडमा' याचा पत्ता छत्तीसगडमधील सुरक्षा दलांना दहा दिवसांपूर्वी मिळाला होता. माडवी हिडमा हा 2013 मध्ये झिरम खोऱ्यात झालेल्या हल्ल्यातील मुख्य आरोपी असल्याचे समजते आहे.

संबंधित बातम्या