कुठे गायब झाल्या नुपूर शर्मा? मुंबई पोलीस दिल्लीत घेतायेत शोध

प्रेषित मुहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा गायब झाल्या आहेत.
Nupur Sharma
Nupur SharmaDainik Gomantak

प्रेषित मुहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा गायब झाल्या आहेत. मुंबई पोलिस नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांचा शोध घेत आहेत. गेल्या चार दिवसांपासून दिल्लीत त्यांचा शोध सुरु होता, मात्र त्यांचा पत्ता लागत नसल्याचे वृत्त आहे. रझा अकादमीच्या तक्रारीवरुन मुंबई पोलिसांनी शर्मांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यासाठी त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

वृत्तानुसार, महाराष्ट्राच्या गृह विभागाचे म्हणणे आहे की, ''भाजपमधून निलंबित करण्यात आलेल्या नुपूर शर्मा यांचा शोध मुंबई पोलिस घेत आहेत. त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांकडे पुरेसे पुरावे आमच्याकडे आहेत. मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) पायधुनी पोलिस ठाण्यात माजी प्रवक्त्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याशिवाय शर्मा यांच्याविरोधात ठाणे पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली आहे.''

Nupur Sharma
प्रेषित मोहम्मद आक्षेपार्ह वक्तव्य : नुपूर शर्मा यांच्या अडचणी वाढल्या

मिळालेल्या माहितीनुसार, नुपूर शर्मा यांना पहिल्यांदा ईमेल करुन बोलावण्यात आले होते. त्याचवेळी आता पोलीस स्वत:हून त्यांना बोलावण्यासाठी आले आहेत. दिल्ली पोलिसांच्या सहकार्य न करण्याच्या वृत्तावर महाराष्ट्र (Maharashtra) सरकारमधील गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, 'हे खरे आहे. महाराष्ट्र पोलिसांचे प्रयत्न सुरु असून दिल्ली (Delhi) पोलिसांनीही मदत करावी.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com