नुपूर शर्मांना SC कडून दिलासा, अटकेची मागणी करणारी याचिका फेटाळली

Nupur Sharma: भारतीय जनता पक्षाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या अटकेसाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
Nupur Sharma
Nupur SharmaDainik Gomantak

Bharatiya Janata Party Spokesperson Nupur Sharma: भारतीय जनता पक्षाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या अटकेसाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्याचे दूरगामी परिणाम होतील, असे सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर कथित आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल शर्मा यांच्यावर कारवाई आणि त्यांच्या अटकेची मागणी करण्यात आली होती.

दरम्यान, शुक्रवारी मुख्य न्यायमूर्ती यूयू लळित, न्यायमूर्ती रवींद्र भट्ट आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. अहवालानुसार, सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) म्हटले की, 'हे दिसण्यात हानिकारक दिसत नाही, परंतु त्याचे दूरगामी परिणाम आहेत. न्यायालयाचे निर्देश देताना नेहमी काळजी घ्यावी. ते परत घ्यावे अशी आमची सूचना आहे.'

Nupur Sharma
नुपूर शर्माला लुकआउट नोटीस, समन्स जारी तरी ही गैरहजर

दुसरीकडे, नुपूर शर्मा यांनी वृत्तवाहीनीवरील चर्चेदरम्यान केलेल्या कथित वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्यानंतर देशाच्या काही भागात उग्र निदर्शने झाली होती. शर्मा यांना अटक करण्याची मागणीही करण्यात आली होती.

Nupur Sharma
नुपूर शर्माला मोठा दिलासा! कोणत्याच राज्यातील पोलिसांनी अटक करू नये- SC

तसेच, अधिवक्ता अबू सोहेल यांच्या वतीने अधिवक्ता चांद कुरेशी यांच्यामार्फत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत 'स्वतंत्र, विश्वासार्ह आणि निष्पक्ष चौकशी' करण्याची मागणी करण्यात आली होती. विशेष म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच या प्रकरणी नोंदवलेल्या सर्व एफआयआर दिल्ली पोलिसांकडे (Police) हस्तांतरित करण्यास सांगितले होते. शर्मा यांच्या विरोधात भारतातील (India) अनेक शहरांमध्ये वेगवेगळ्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com