पुन्हा एक 'गंगाराम चौधरी', 58 वर्षीय आमदार बसलेय 10वीच्या परीक्षेला, 40 वर्षानंतर शिक्षणाचे वेध

परीक्षेला बसण्यासाठी किंवा शिक्षण घेण्यासाठी वयाचे कोणतेही बंधन नाही
पुन्हा एक 'गंगाराम चौधरी',  58 वर्षीय आमदार बसलेय 10वीच्या परीक्षेला, 40 वर्षानंतर शिक्षणाचे वेध
Angada KanharDainik Gomantak

फुलबनी: तुम्ही जर सध्या जोरदार चर्चा असलेला 'दसवी' हा चित्रपट बघितला असेल, तर तो तुम्हाला नक्कीच विचार करायला लावणारा चित्रपट आहे.त्यात एक गंगाराम चौधरी हा मुख्यमंत्री असतो मात्र तो फक्त आठवीपर्यंत शिकलेला असतो. पुढे गंगाराम चौधरीसोबत असं काही घडतं की त्याला जेल होते आणि जेलमध्येच दहावी परिक्षा देण्याच ठरवतो. आता तुम्हाला हा प्रसंग सांगण्याच कारण असं की, हि गोष्ट फक्त चित्रपटातच नाही तर कुणाच्यातरी खऱ्या आयुष्यातही घडली आहे. ओडीसा (Odisha) राज्यातही एक गंगाराम चौधरी आहे तो तुम्हाला माहिती आहे का? दहावीची परीक्षा देतो आणि उत्तीर्ण होतो पण त्यासाठी गंगाराम चौधरीने घेतलेली मेहनत चित्रपटात रंगत आणते. अशीच काहीशी रंगत खऱ्या आयुष्यातील आमदार आणि एक सरंपच साहेब आणणार आहेत. (Dasvi Impact)

ओडिशा राज्यातील फुलबनी येथील 58 वर्षीय आमदाराने 1978 साली कौटुंबिक कारणांमुळे शिक्षण सोडले होतं. मात्र त्या आमदाराने शिक्षणाची (Education) जिद्द सोडली नाही. त्या आमदाराने 'शिकण्याला वय ​​नाही' ही जुनी म्हण सिद्ध केली. यावर्षी दहावीच्या परीक्षेसाठी फुलबनी येथील बीजू जनता दलाचे (BJD) आमदार अंगदा कान्हार (Angada Kanhar) शुक्रवारी माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (BSE) सुरू असलेल्या मॅट्रिक परीक्षेच्या पहिल्या पेपरसाठी उपस्थित होते.रुजांगी हायस्कूलमध्ये इंग्रजीचा पेपर देताना कन्हार त्याच्या दोन मित्रांसह दिसले.

Angada Kanhar
"तत्काळ मुख्यमंत्री बनवा", सचिन पायलट यांनी काँग्रेसकडे केली मागणी

परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी कन्हार म्हणाले, "मी 1978 मध्ये माझ्या इयत्ता 10 व्या वर्गात होतो, परंतु काही कौटुंबिक समस्यांमुळे परीक्षेला बसू शकलो नाही. अलीकडे, मला सांगण्यात आले की 50 किंवा त्याहून अधिक वयाचे बरेच लोक परीक्षा देत आहेत. म्हणून मीही बोर्डाच्या परीक्षेला बसायचे ठरवले. "परीक्षेला बसण्यासाठी किंवा शिक्षण घेण्यासाठी वयाचा कोणताही अडथळा नाही." कन्हार हे एकमेव राजकारणी नाही, जे दहावीच्या परीक्षेला बसले आहे. त्यांच्यासोबत त्याचा एक मित्र आहे जो गावचा सरपंच आहे.

Angada Kanhar
भारताने 14,000 हून अधिक बांगलादेशी नागरिकांना पाठवलं मायदेशी

"आम्ही आमच्या केंद्रावर बोर्ड परीक्षा घेत आहोत जी ओपन स्कूल परीक्षा आहे. ज्यांना काही कारणास्तव आपला अभ्यास अर्धवट सोडावा लागला त्यांच्यासाठी ही एक विशेष परीक्षा आहे. फुलबनीच्या आमदारासह आमच्या केंद्रावर तब्बल 63 विद्यार्थ्यांनी SIOS परीक्षा दिली आहे. अंगद कान्हार आणि त्याचा एक मित्र जो सरपंच आहे. ही परीक्षा 10 मे पर्यंत संपेल," असे रुजंगी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अर्चना बस यांनी सांगितले. ओडिशामध्ये शुक्रवारपासून सुरू झालेल्या दहावीच्या राज्य बोर्डाच्या परीक्षेसाठी एकूण 5.8 लाख विद्यार्थी बसले आहेत. अभिषेक बच्चन, यामी गौतम, आणि निर्मत कौर सारखी मोठी स्टार कास्ट असणारा दसवी चित्रपट लोकांना प्रेरणा देणारा तर आहेच शिवाय राजकारण्यांसाठीही तो एक उत्तम सल्लागाराचे काम करणारा आरसा दाखवणारा चित्रपट आहे. त्यामुळे हा चित्रपट मनाला सुन्न करून जाणारा आणि वैचारिक पातळीवर विचार करायला लावणारा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com