ओडिसा: असे म्हटले जाते की, बाहेरच्या सौंदर्यापेक्षा अंतर्मनाचे सौंदर्य पाहिले पाहिजे. अंतर्मनाच्या सौंदर्यावर प्रेम केले पाहिजे. आणि त्याचे जीवंत उदाहरण म्हणजे ओडिसा येथे झालेला हा विवाह सोहळा. 17 व्या वर्षी अॅसिड हल्ला झालेल्या प्रमोदिनीने नुकतेच तिच्या प्रियकराशी लग्न केले. ओडिशाच्या जगतसिंगपूर जिल्ह्यात राहणाऱ्या प्रमोदिनीने सोमवारी आपल्या प्रियकराशी एकदम धुमधडाक्यात लग्न केले.
प्रमोदिनी ता 29 वर्षांची आहे आणि तिचे नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा पार पडला. प्रमोदिनी 17 वर्षांची होती जेव्हा तिच्यावर असिडने हल्ला करण्यात आला या अपघातात तिचे शरीर 80% जळले होते. आणि या हल्ल्यात ती दोन्ही डोळ्यांनी आंधळी झाली.
मात्र या घटनेचा प्रमोदिनीने स्वतःवर आणि तिच्या आयुष्यावर कुठलाही नकारात्मक परिणाम होवू दिला नाही. प्रमोदिनींचे विचार हे खूप सकारात्मक होते तिने स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी पुर्ण प्रयत्न केले. लग्नाच्या दिवशी प्रमोदिनी म्हणाली की, हा तिच्या आयुष्यातील सर्वात चांगला दिवस आहे. मला स्वतःचे कुटुंब व प्रियकर यांच्याशी लग्न करायचे होते आणि मला पाहिजे तसे घडले आहे.
अॅसिड हल्ला 2009 मध्ये झाला
18 एप्रिल 2009 रोजी माझ्यावर अॅसिड फेकण्यात आले. त्यावेळी सैनिक म्हणून काम करणाऱ्या संतोष वेदांतने लग्नाचा प्रस्ताव ठेवला पण प्रमोदिनीने त्याला नकार दिला, त्यानंतर संतोषने तिच्या चेहऱ्यावर अॅसिडफेकले. त्यावेळी प्रमोदिनी तिच्या इंटरमीडिएटचा अभ्यास करत होती.
प्रमोदिनीच्या महाविद्यालयाजवळ एक सैन्य छावणी होती, तिथे संतोषने प्रमोदिनी पाहिले आणि लग्नाचा प्रस्ताव ठेवला. त्यावेळी, प्रमोदिनी खूप लहान होती आणि तिला पुढे अभ्यास करायचा होता, म्हणून कुटुंबीयांनी लग्न करण्यास नकार दिला. तरीही, संतोष प्रमोदिनीचा पाठलाग करत होता आणि 2009 मध्ये संतोषने प्रमोदिनीवर अॅसिड फेकले.
सोशल मिडियावरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं वकिलाला पडलं महाग; जाणून घ्या कारण
मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांची भेट घेतली
प्रमोदिनी यांनी संतोषविरोधात पोलिसांत तक्रार दिली पण 2012 पर्यंत पोलिसांना त्याच्याविरूद्ध काही सुगावा लागलेला नाही. यानंतर हे प्रकरण बंद झाले पण सोशल मीडियावर हे प्रकरण व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी प्रमोदिनी यांची भेट घेऊन पुन्हा चौकशीचे आदेश दिले. संतोषला 2017 मध्ये अटक करण्यात आली होती आणि तो अजूनही तुरूंगात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची भाषणं कोण लिहितं? PMO ने दिली माहिती
सरोज साहूशी मैत्री
ज्या रूग्णालयात प्रमोदिनी उपचार घेत होती तीथेच एक नर्स सरोज साहू ची मैत्रिण होती. नर्स ने साहूला अॅसिड हल्ल्याचा सामना करणाऱ्या महिलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बोलावले होते. सरोजने प्रमोदिनीशी बोलण्याचा प्रयत्न केला पण तीने त्यावेळी काही उत्तर दिले नाही. मात्र हळू हळू त्यांच्या भेटी वाढत गेल्या आणि दोघे चांगले मित्र बनले.