ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी सर्व कॅबिनेट मंत्र्यांचा घेतला राजीनामा

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी सर्व कॅबिनेट मंत्र्यांचा राजीनामा घेतला आहे.
Odisha CM Naveen Patnaik
Odisha CM Naveen PatnaikDainik Gomantak

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. लवकरच मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार आहेत. नवीन मंत्रिमंडळ 5 जून रोजी शपथ घेणार असल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, सर्वप्रथम ओडिशा (Odisha) विधानसभेचे अध्यक्ष सूर्य नारायण पात्रो यांनी राजीनामा दिला. त्यानंतर सर्व मंत्र्यांनी आपापल्या राजीनाम्याची पत्रेही आलटून-पालटून सादर केली.

Odisha CM Naveen Patnaik
झारखंड, ओडिशा अन् बंगालमध्ये वाहणाऱ्या 'या' नदीत सापडते सोने!

तसेच, बीजेडीने गेल्या महिन्यात 29 तारखेला आपल्या कार्यकाळाची तीन वर्षे पूर्ण केली. मुख्यमंत्री नवीन पटनाईक मंत्रिमंडळात (Cabinet) फेरबदल करणार असल्याची चर्चा होती. काही वादही समोर आले होते, त्यानंतर नवीन पटनायक यांनी आपल्या सर्व मंत्र्यांचा राजीनामा देऊन नवीन मंत्रिमंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

शिवाय, नवीन पटनायक 20 जूनपासून परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्री रोम आणि दुबईला भेट देणार आहेत. याआधी त्यांना नवीन मंत्रिमंडळ बनवायचे आहे. नवीन मंत्री रविवारीच शपथ घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सीएमओच्या सूत्रांनी सांगितले की, ''पाचव्यांदा मुख्यमंत्री झालेल्या पटनायक यांना विदेशात जाण्यापूर्वी मंत्रालयात सुधारणा करण्याची इच्छा आहे. राज्यसभेच्या तीन जागा आणि ब्रजराजनगर विधानसभा मतदारसंघातील (Assembly Constituency) पोटनिवडणुकीत सत्ताधारी बीजेडीने विजय मिळवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मंत्रालयात फेरबदलाची कसरत सुरु झाली आहे.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com