Odisha Minister Naba Das: ओडिशाच्या आरोग्य मंत्र्यांवर प्राणघातक हल्ला; पोलिस कर्मचाऱ्याने घातल्या गोळ्या

गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल
Odisha Health Minister Naba Das
Odisha Health Minister Naba DasDainik Gomantak

Odisha Minister Naba Das: ओडिशाचे आरोग्य मंत्री नबा किशोर दास यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. एका कार्यक्रमाला गेलेल्या या कॅबिनेट मंत्र्यावर पोलीस कर्मचाऱ्याने गोळीबार केला. दास यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. झारसुगुडा जिल्ह्यातील बृजराजनगरजवळ हा हल्ला झाला. येथील गांधी चौकाजवळ पोलिस कर्मचाऱ्याने दास यांच्यावर गोळ्या झाडल्या.

Odisha Health Minister Naba Das
Mughal Garden Renamed: असा आहे मुघल गार्डनचा इतिहास! इंग्रजांनी 106 वर्षांपूर्वी दिले होते नाव...

कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आरोग्यमंत्री नबा दास त्यांच्या कारमधून बाहेर आले तेव्हा एएसआयने त्यांच्यावर गोळीबार केला. गोळीबाराचे कारण समोर आलेले नाही. या घटनेनंतर सत्ताधारी बिजू जनता दलाचे कार्यकर्ते धरणे आंदोलनावर बसले. त्यामुळे घटनास्थळी तणाव निर्माण झाला आहे.

ओडिशाच्या कॅबिनेट मंत्र्यावर गोळीबार करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव गोपाल दास असे असून तो गांधी चौकात ASI म्हणून तैनात होता. एएसआय गोपाल दास यांनी आपल्या रिव्हॉल्व्हरमधून नबा दास यांच्यावर 4 ते 5 राउंड फायर केले. गोपाल दास याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. नबा दास यांची प्रकृती गंभीर असून त्यांना विमानाने भुवनेश्वरला नेण्यात येत आहे.

Odisha Health Minister Naba Das
Himanta Biswa Sarma: लग्न करा, मुले जन्माला घाला, नाहीतर कठीण आहे... आसामच्या मुख्यमंत्र्यांचा महिलांना सल्ला

नबा दास यांनी शनि शिंगणापूरमध्ये दान केले होते एक कोटीचे दान

नबा दास हे बिजू जनता दलाचे ज्येष्ठ नेते आहेत. महाराष्ट्रातील शनि शिंगणापूर येथील मंदिराला एक कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा सोन्याचा कलश त्यांनी दान दिला होता. त्यामुळे ते प्रकाशझोतात आले होते. हा कलश १.७ किलो सोन्याचा आहे. शिवाय ५ किलो चांदीचा कलशही त्यांनी दान दिला होता.

कोण आहेत नबा किशोर दास?

नाबा किशोर दास हे ओडिशातील झारसुखडा जिल्ह्यातील महत्वाचे नेते आहेत. ते आधी काँग्रेसमध्ये होते, नंतर त्यांनी बिजू जनता दलात प्रवेश केला. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या सरकारमध्ये ते आरोग्य मंत्री आहेत. दरम्यान, बीजेडीचे वरिष्ठ नेते प्रसन्न आचार्य म्हणाले की, या घटनेने आम्हाला धक्का बसला आहे. ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतो. या घटनेचा आम्ही निषेध करतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com