
Odisha Crime News: ओडिशातील जाजपूर जिल्ह्यात सामूहिक बलात्कारापासून वाचण्यासाठी एका मुलीने शाळेच्या इमारतीवरुन उडी मारली, त्यात ती जखमी झाली. मुलीला गंभीर अवस्थेत कलिंगनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाच जणांनी तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री ही घटना घडली. केंझार जिल्ह्यातील रहिवासी असलेली मुलगी तिच्या भावासह सुकिंदा क्रोमाईट व्हॅलीमध्ये असणाऱ्या बहिणीच्या घरी जात होती. ते बसमधून उतरले तेव्हा परिसरात जोरदार पाऊस पडत होता. मुसळधार पावसामुळे पीडितेला आणि तिच्या भावाला शाळेत (School) आश्रय घेण्याचा सल्ला आरोपींनी दिला होता.
मुलीच्या भावाला बेदम मारहाण करण्यात आली
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, रात्री काही वेळानंतर हे पाच जण शाळेत परतले. आरोपींनी (Accused) रात्री उशिरा मुलीच्या भावाला बेदम मारहाण केली होती. त्यानंतर ते मुलीच्या मागे लागले. त्यांनी मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला असता तिने शाळेच्या इमारतीच्या छतावर जाऊन तेथून उडी मारली.
आरडाओरडा ऐकून ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले
यानंतर भावाच्या मदतीसाठी ओरडण्याचा आवाज ऐकून स्थानिक लोकांनी घटनास्थळ गाठून पोलिसांना माहिती दिली. काही वेळातच पोलिसांनी (Police) गावात पोहोचून मुलीला रुग्णालयात दाखल केले. चौकशीनंतर आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.