पहिली ते बारावीच्या शालेय अभ्यासक्रमात ओडिशात ३० टक्के कपात

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 27 ऑगस्ट 2020

विद्यार्थ्यांना सुधारित अभ्यासक्रम शिक्षण मंडळांच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा देणे विद्यार्थ्यांना शक्य होण्यासाठी अभ्यासक्रमात त्यानुसार सुधारणा करण्यात आली आहे.

भुवनेश्‍वर: कोरोनामुळे शाळा सुरू होण्यास विलंब लागणार असल्याने ओडिशा सरकारने यंदाच्या शालेय अभ्यासक्रमात ३० टक्के कपात केली आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री समीर रंजन दास यांनी ही घोषणा बुधवारी केली. 

ते म्हणाले,‘‘ ओडिशातील माध्यमिक शिक्षण मंडळ (बीएसई), राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण संस्‍था (एससीआआरटी) आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा (एसएचएसई) च्या अभ्यासक्रम समितीच्या शिफारशीवरून पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम ३० टक्क्याने कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. विद्यार्थ्यांना सुधारित अभ्यासक्रम शिक्षण मंडळांच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा देणे विद्यार्थ्यांना शक्य होण्यासाठी अभ्यासक्रमात त्यानुसार सुधारणा करण्यात आली आहे.’’

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या