आता OTT वरही सेन्सॉर; सोशल मीडियावरून 24 तासांत हटवावा लागणार आक्षेपार्ह मजकूर

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 25 फेब्रुवारी 2021

नव्या नियमांअतर्गत सोशल माडियावरील माहितीची तीन स्तरीय तपासणी होणार. महिलांविरोधातील आक्षेपार्ह पोस्ट 24 तासात हटवावी लागेल. सोशल मीडियावर अश्लील आणि आक्षेपार्ह पोस्ट टाकता येणार नाही. संबंधित व्यक्ती दोषी आढळल्यास ५ वर्षांची शिक्षा होणार.

नवी दिल्ली : आज सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मशी संबंधित नवीन नियम प्रसिद्ध करण्यात आले. यासंदर्भात पत्रकार परिषदेत  केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले की, सर्व सोशल मीडिया कंपन्यांनी भारतात व्यवसायासाठी यावे. परंतु सोशल मीडियाच्या चुकीच्या वापराबद्दल तक्रारीचे फोरम असावे. सोशल मीडियाच्या दुरुपयोगाबद्दल वर्षानुवर्षे चिंता व्यक्त केली जात आहे. मंत्रालयाने व्यापक चर्चा करून डिसेंबर 2018 मध्ये एक मसुदा तयार केला होता. 

मोदी स्टेडियमवरुन हार्दीक पटेंलचा भाजपवर हल्लाबोल

सोशल मीडियाच्या गैरवापरबाबत व ओटीटी प्लॅटफॉर्मसंबंधात अनेक तक्रारी येत असल्याचे रविशंकर प्रसाद म्हणाले. हिंसा निर्माण करण्यसाठी सोशल मीडियाचा वापर केला जातो. सोशल मीडियाद्वारे व्यवसाय करणाऱ्यांचं भारत स्वागत करतो. परंतु, सोशल मिडियावरील आक्षेपार्ह गोष्टींना संमती नाही. डिजीटल मिडीयाला अफवा पसरवण्याचा अधिकार नाही. यासाठीच या नव्या नियमांअतर्गत सोशल माडियावरील माहितीची तीन स्तरीय तपासणी होणार. महिलांविरोधातील आक्षेपार्ह पोस्ट 24 तासात हटवावी लागेल. सोशल मीडियावर अश्लील आणि आक्षेपार्ह पोस्ट टाकता येणार नाही. संबंधित व्यक्ती दोषी आढळल्यास 5 वर्षांची शिक्षा होणार. तीन महिन्यात नियमावली लागू होणार असल्याचं रविशंकर प्रसाद म्हणाले. 

OTT  प्लॅटफॉर्म म्हणजे काय?

ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये ऑडिओ-व्हिज्युअल कन्टेन्टचा समावेश असतो. नवीन वेब मिडिया हा या OTT प्लॅटफॉर्ममध्येच योतो. ज्यामध्ये लघुपट, माहितीपट, वेब सिरीज यांचा समावेश आहे. यापैकी काही कन्टेन्ट हा आपण फ्री मध्ये पाहू शकतो, तर काहींसाठी शुल्क आकारले जाते. याचबरोबर, ऑडिओ-व्हिज्युअल कंटेंटचा हा सोशल मीडियाद्वारे देखील शेअर केला जात असल्यामुळे ही नवीन नियमावली सोशल माडियासाठीदेखील असणार आहे. Amazonप्राइम व्हिडिओ,नेटफ्लिक्स,डिस्ने + हॉटस्टार ही याची काही उदाहरणे आहेत.

बाजारात आलेलं पिवळं कलिंगड बघितलं का ? कर्नाटकच्या शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग

भारतात 1.7 कोटी ट्विटर युजर्स आहेत,53 कोटी व्हॉट्सअॅप व 21 कोटी इन्स्टाग्राम युजर्स आहेत. भारतात सोशल मीडिया वापरणाऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. ओटीट प्लॅटफॉर्मवर यंदाच्या संसदिय आधिवेशात 50 प्रश्न विचारण्यात आले.माध्यामांचं स्वातंत्र लोकशाहीसाठी महत्त्वाचं असल्याचं व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले. ओटीट प्लॅटफॉर्मशी संबंधित लोकांची दिल्ली, मुंबई, चेन्नई इथं बैठक घेतली जाईल.  यासाठी सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली बैठक पारित केली जाणार आहे. भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडतेशी, राज्याची सुरक्षा, सार्वजनिक सुव्यवस्था, परदेशी राज्यांशी संबंध किंवा बलात्कार, लैंगिकता इत्यादींशी संबंधित मजकूराबाबत नियमावली तयार केली जाणार आहे. 

संबंधित बातम्या