भाजप उमेदवाराच्या वाहनात सापडले ईव्हीएम; चार अधिकारी निलंबित

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 2 एप्रिल 2021

भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या वाहनातून ईव्हीएम घेऊन जात असताना नागरिकांच्या निदर्शनास आल्याने  ही घटना उघडकीस आली होती.

आसाम मध्ये सुरु असणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियत झालेल्या गैरप्रकारानंतर ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा वर आला आहे. ईव्हीएम मशीन वाहून नेणारे निवडणूक आयोगाचे वाहन बंद पड्ल्याने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या वाहनातून ईव्हीएम घेऊन जात असताना नागरिकांच्या निदर्शनास आल्याने  ही घटना उघडकीस आली होती. या प्रकरणात निवडणूक आयोगाने शिस्तभंगाची कारवाई केली असल्याचे समजते आहे. 

या प्रकरणाची दाखल घेत, भारतीय निवडणूक आयोगाच्या (ईसीआय) चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिली आहे.  निवडणूक आयोगाने सांगितले की, परिवहन प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याबद्दल पीठासीन अधिकाऱ्यास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच पीओ व अन्य तीन अधिका्यांना निलंबित करण्यात आले आहे. ईव्हीएम सील सीलबंद करण्यात आला असला तरी एलएसी 1 रतबारी (एससी) च्या क्रमांक 149 मधील इंदिरा एमव्ही स्कूलमध्ये पुन्हा मतदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ( officers suspended in EVM case in Assam)

आसाममधील (Assam) ईव्हीएम (EVM) संबंधित या घटनेची गंभीर दाखल घेत निवडणूक आयोगाने (Election Comission) त्याबद्दलचा अहवाल जारी केला आहे. निवडणूक आयोगाच्या अहवालात म्हटले आहे की,  एलएसी 1 रताबारी (एससी) च्या पोलिंग पार्टी 149 इंदिरा एमव्ही स्कूलच्या रस्त्यावर अपघात झाला. मतदान पक्षामध्ये पीठासीन अधिकारी आणि 3 मतदान कर्मचारी यांचा समावेश होता. त्याच्यासमवेत एक कॉन्स्टेबल आणि होमगार्ड असलेले पोलिस कर्मचारी होते. या प्रकरणात पोलिंग पार्टी मधील 3 अधिकाऱ्यांवर निवडणूक आयोगाने कारवाई केल्याचे समजते आहे. 

संबंधित बातम्या