वाहनचालकांनो सावधान! आता जुन्या वाहनांवर द्यावा लागू शकतो टॅक्स 

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 25 जानेवारी 2021

वाहने जुनी झाल्यानंतर एका ठराविक कालावधीनंतर या वाहनांच्या वापरामुळे प्रदूषणात वाढ होते. त्यामुळे ज्यांच्याकडे अगदीच जुनी वाहने आहेत, त्यांना आता आपल्या वाहनांवर 'ग्रीन टॅक्स' भरावा लागू शकतो.

वाहने जुनी झाल्यानंतर एका ठराविक कालावधीनंतर या वाहनांच्या वापरामुळे प्रदूषणात वाढ होते. त्यामुळे ज्यांच्याकडे अगदीच जुनी वाहने आहेत, त्यांना आता आपल्या वाहनांवर 'ग्रीन टॅक्स' भरावा लागू शकतो. कारण नुकतेच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पर्यावरणाला प्रदूषित करणाऱ्या जुन्या वाहनांवर 'ग्रीन टॅक्स' लावण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. 

'आकाश' क्षेपणास्त्राच्या पुढील आवृत्तीची यशस्वी चाचणी  

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने आज याबाबतची माहिती दिली असून, जुन्या वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला अटकाव करण्यासाठी म्हणून  'ग्रीन टॅक्स' आकारण्याचा प्रस्तावाला रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मान्यता दिल्याचे म्हटले आहे. फिटनेस प्रमाणपत्र नूतनीकरणाच्या वेळी 8 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांवर रस्ता कराच्या 10% ते 25% ग्रीन टॅक्स आकारला जाऊ शकतो, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने म्हटले आहे.    

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मान्यता दिलेला हा प्रस्ताव औपचारिकरित्या अधिसूचित होण्यापूर्वी तो राज्यांच्या सल्लामसलतीसाठी जाणार आहे. आणि राज्यांकडून या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर जुन्या वाहनांवर 'ग्रीन टॅक्स' आकारण्यात येईल.  

संबंधित बातम्या