आरोग्य केंद्रावर रॅपिड अँटीजेन चाचणी (RAT) बूथ स्थापित करा: केंद्र सरकार

देशात कोरोनाचे वाढते प्रमाण पाहता केंद्र सरकार सतर्क झाले आहे.
Omicron variant

Omicron variant

Dainik Gomantak 

देशात कोरोनाचे वाढते प्रमाण पाहता केंद्र सरकार सतर्क झाले आहे. केंद्र सरकारने राज्यांना याबाबत काही सूचना दिल्या आहेत. संक्रमित व्यक्तीची वेळेवर ओळख होण्यासाठी सर्व संसाधनांचा वापर करून चाचणीचे प्रमाण वाढवावे लागेल. प्रत्येक आरोग्य केंद्रावर रॅपिड अँटीजेन चाचणी (RAT) बूथ स्थापित करण्यात यावे, असे केंद्राचे म्हणणे आहे.

<div class="paragraphs"><p>Omicron variant</p></div>
'फाळणीला बापू नाही तर... : मुख्यमंत्री भूपेश बघेल

केंद्रीय आरोग्य सचिव लव अग्रवाल आणि ICMR चे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी एक पत्र लिहून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना या बाबत माहिती दिली. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी आण्विक चाचणी प्रयोगशाळांच्या पूर्ण क्षमतेचा वापर करावा, असा सल्ला देण्यात आला आहे. याशिवाय, केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि कुटुंब कल्याण विभागाने जारी केलेला निधी इमर्जन्सी कोविड-19 रिस्पॉन्स प्लॅन (ECRP) अंतर्गत चाचणी उपकरणे खरेदी आणि BSL-2 प्रयोगशाळा उभारण्यासाठी वापरला जावा, असे ही सांगण्यात आले आहे.

जुन्या अनुभवाचा दाखला देत मंत्रालयाने म्हटले आहे की, जर संसर्गाची प्रकरणे अनेक पटींनी वाढली तर आरटी-पीसीआर (RT-PCR) चाचणीद्वारे रुग्णाची ओळख पटविण्यात पाच ते आठ तासांचा विलंब होईल. अशा परिस्थितीत, ICMR ने आधीच जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार राज्यांनी रॅपिड अँटीजेन चाचणी (RAT) करण्यास सुरुवात केली पाहिजे.

<div class="paragraphs"><p>Omicron variant</p></div>
1 जानेवारीपासून सर्वसामान्यांसाठी राष्ट्रपती भवन राहणार बंद

ओमिक्रॉन: सीरमला नवीन औषधांची चाचणी घेण्याची परवानगी
कोरोनाच्या ओमिक्रॉन (Omicron variant) प्रकाराला निष्प्रभ करण्यासाठी लस (Vaccine) तयार करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला ओ नवीन लस विकसित करण्यासाठी औषधाच्या घटकाची चाचणी आणि विश्लेषण करण्याची परवानगी दिली आहे.

महाराष्ट्र: लग्न समारंभात फक्त 50 लोकांना परवानगी
महाराष्ट्र सरकारच्या नव्या सूचनेनुसार लग्न समारंभ, सामाजिक, राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमांना केवळ 50 लोकांनाच उपस्थित राहता येणार आहे. अंत्यसंस्कारासाठी फक्त 20 लोकांना परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर पोलिसांनी मुंबईत 30 डिसेंबर ते 7 जानेवारी या कालावधीत कलम 144 लागू केले आहे. या अंतर्गत मुंबईतील रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, पब, बारमध्ये खुल्या किंवा बंद ठिकाणी नवीन वर्ष साजरे करण्यास परवानगी दिली जाणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com