Republic Day: प्रजासत्ताक दिनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा, नवी नोझल कोरोना लस उपलब्ध

Bharat Biotech: जगभरात कोरोनाचा धोका पुन्हा वाढू लागला आहे. याचीच खबरदारी घेत भारतानेही सावध पाऊले उचलायला सुरुवात केली आहे.
Union Health Minister Dr. Mansukh Mandavia and Union Technology Minister Jitendra Singh
Union Health Minister Dr. Mansukh Mandavia and Union Technology Minister Jitendra SinghDainik Gomantak

मंगेश वैशंपायन

जगभरात कोरोनाचा धोका पुन्हा वाढू लागला आहे. याचीच खबरदारी घेत भारतानेही सावध पाऊले उचलायला सुरुवात केली आहे. यातच आज प्रजासत्ताक दिनानिमित्त नाकावाटे दिली जाणारी इनकोव्हॅक ही कोविड-19 लस उपलब्ध झाली आहे. (Bharat Biotech Launch Intranasal Vaccine)

मोदी सरकारमधील केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.मनसुख मांडविया आणि केंद्रीय तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी आज राजधानी दिल्लीत ही लस लॉन्च केली.

भारत बायोटेक कंपनीने वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या सहकार्याने ही कोरोना प्रतिबंधक लस तयार केली आहे. विशेष म्हणजे, ही लस नाकावाटे शरीरात पोहोचवली जाते.

दरम्यान, 6 सप्टेंबर 2022 मध्ये डीजीसीआयने 18 वर्ष वयोगटापेक्षा जास्त वयाच्या प्रौढांना आपत्कालीन वापरासाठी 'इनकोव्हॅक' या कोरोना प्रतिबंध लसीच्या वापरास मान्यता दिली होती. यापूर्वी, डीजीसीआयकडून इंट्रानेसल हेटरोलॉजस बूस्टर लसीच्या वापरासाठी भारत बायोटेकने (Bharat Biotech) अधिकृत परवानगीसाठी अर्ज केला होता.

Union Health Minister Dr. Mansukh Mandavia and Union Technology Minister Jitendra Singh
Covid19 In India: कोरोना स्थितीवर उच्चस्तरीय बैठक, 500 नमुन्यांची जीनोम सिक्वेन्सिंग

तर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मतानुसार, इनकोव्हॅक ही लस बूस्टर डोस म्हणूनच देण्यात येईल. साधारणत:हा प्रत्येक प्रौढ व्यक्तीला त्याचे चार थेंब नाकावाटे दिले जातील.

तसेच, प्रजासत्ताक दिनानिमित्त भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णा एला यांनी नवीन कोरोना प्रतिबंधक लस लॉन्च करण्याची घोषणा केली होती.

विशेष म्हणजे, सरकार (Government) आणि खाजगी लसीकरण केंद्रांना ही लस 800 रुपये दराने देणार असल्याची घोषणाही गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच कंपनीकडून करण्यात आली होती.

Union Health Minister Dr. Mansukh Mandavia and Union Technology Minister Jitendra Singh
China Corona Update: चीनमध्ये कोरोनाचा कहर! 80 % लोकसंख्या बाधित, हाजारो मृत्यू; यंत्रणा हाय अलर्टवर

शिवाय, भारत बायोटेकने वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या सहकार्याने 'इनकोव्हॅक' ही नाकावाटे दिली जाणारी कोरोना प्रतिबंधक लस विकसित केली आहे.

कोवॅक्सिन ही पहिली कोरोना प्रतिबंधक स्वदेशी लसही भारत बायोटेकनेच तयार केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com