Vande Bharat: संक्रातीनिमित्त केंद्राकडून तेलंगणाला भेट, 'या' मार्गावर धावणार वंदे भारत एक्सप्रेस

पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा
Vande Bharat Express
Vande Bharat Express Dainik Gomantak

Vande Bharat: पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर तेलंगणातील सिकंदराबाद ते आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचे डिजिटली उद्घाटन करणार आहेत. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी आणि तेलंगणाचे राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन नवीन ट्रेनच्या उद्घाटन समारंभात सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर स्वतः उपस्थित राहणार आहेत.

Vande Bharat Express
Nitin Gadkari: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याच्या धमक्या, कार्यालयात दाऊदच्या नावाने फोन...

या नव्या ट्रेनची नियमित सेवा 16 जानेवारीपासून सुरू होणार असून, शनिवारपासून तिकीटांचे बुकिंग सुरू झाल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. दक्षिण मध्य रेल्वे (SCR) ने म्हटले आहे की, विशाखापट्टणम-सिकंदराबाद एक्सप्रेस (20833) विशाखापट्टणमहून सकाळी 5.45 वाजता सुटेल आणि 2.15 वाजता सिकंदराबादला पोहोचेल. सिकंदराबाद-विशाखापट्टणम ट्रेन (20834) दुपारी 3:00 वाजता सिकंदराबादहून सुटेल आणि रात्री 11:30 वाजता विशाखापट्टणमला पोहोचेल. ही ट्रेन दोन्ही दिशांना राजमुंद्री, विजयवाडा, खम्मम आणि वारंगल येथे थांबेल.

Vande Bharat Express
Manish Sisodia: एक दिवसांपूर्वी केजरीवालांना नोटीस आज मंत्री सिसोदियांच्या घरी CBI चा छापा

रेल्वेने सांगितले की, या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये 14 वातानुकूलित चेअर कार आणि दोन एक्झिक्युटिव्ह वातानुकूलित चेअर कार कोच आहेत. या ट्रेनची प्रवासीक्षमता 1,128 इतकी आहे. या रेल्वेगाडीमुळे या दोन स्थानकांदरम्यान हायस्पीड वाहतूक सुविधा प्रवाशांना उपलब्ध होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com