पुन्हा एकदा पश्चिम बंगालमध्य़े बॉम्बहल्ला

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 6 मार्च 2021

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूकीचे वारे वाहत असताना तृणमुल कॉंग्रेस आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांचे फैरी झडत आहेत

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूकीचे वारे वाहत असताना तृणमुल कॉंग्रेस आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांचे फैरी झडत आहेत. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा बॉम्बहल्ला झाला आहे. या हल्ल्यात भाजपचे सहा कार्यकर्ते जखमी झाले आहेत. या हल्ल्यामधील दोन भाजप कार्यकर्त्यांची स्थिती खूपच गंभीर आहे. शुक्रवारी रात्री लग्नावरुन परत येत असताना काही अज्ञातांकडून हा बॉम्बहल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या भाजप कार्यकर्त्यांवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहे.

मात्र भाजप कार्यकर्त्यांवरील हल्लामागे तृणमुल कॉंग्रेस असल्य़ाचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. आपण लग्नावरुन परत येत असताना अज्ञाताकडून बॉम्बहल्ला करण्यात आला असल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान पश्चिम बंगाल पोलिस या बॉम्बहल्ल्याचा अधिक तपास करत आहेत. या हल्ल्यात शोवन देबनाथ, अपर्ण, स्वपन, विक्रम आणि महादेव अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

शेतकरी आंदोलन: कुंडली वेस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेसवेवर चक्का जाम शेतकरी...

तृणमुल कॉंग्रेसच्या नेत्याने त्यांच्या पक्षावर भाजपकडून करण्यात आलेला आरोप फेटाळत या बॉम्बह्ल्ल्य़ा मागे भाजप नेते वरुण प्रामाणिक यांचा हात असल्याचा दावा केला आहे. प्रामाणिक यांनी हा बॉम्ब तिथे ठेवला होता. ज्य़ामध्ये त्यांचेच सहा कार्यकर्त्ये जखमी झाले आहेत. 

 

संबंधित बातम्या