भारतीय सैन्यातून तब्बल एक लाख सैनिक कमी केले जाणार

दैनिक गोमंतक
मंगळवार, 6 एप्रिल 2021

भारतीय लष्कराचे स्वरूप बदलण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सैन्याच्या काही तुकड्या लहान करण्याची सध्या तयारी सुरू आहे.

भारतीय लष्कराचे स्वरूप बदलण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सैन्याच्या काही तुकड्या लहान करण्याची सध्या तयारी सुरू आहे. त्याअंतर्गत सैन्याच्या लढाऊ सैन्याला पुरवठा व पाठिंबा देण्याचे काम करणाऱ्या सैनिकांची संख्या कमी होणार असल्याचे दिसून येते आहे. येत्या तीन ते चार वर्षांत सुमारे एक लाख सैनिक कमी करण्याचे लक्ष्य सैन्याने निश्चित केले असल्याचे समजते आहे. (One lakh Indian army soldiers will be reduced )

सैन्याच्या वरिष्ठ अधिका्यांनी नुकतीच संरक्षण मंत्रालयाशी (Diffence Ministry) संबंधित संसदीय समितीसोबत या विषयावर चर्चा केली असल्याचे समाजते आहे. सैन्यांच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार सैन्य (पायदळ) आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज कसे करता येईल याकडे सध्या लक्ष केंद्रित केले जाणार आहे. कारण सीमा संरक्षणाची मोठी जबाबदारी पायदळातील सैन्यावर आहे. तसेच पुढच्या काळात या दलाला अत्याधुनिक तंत्रज्ञान पुरविले जाणार असल्याचे सांगितलॆ जाते आहे. परिणामी पुरवठा आणि सहाय्य कामात गुंतलेल्या सैनिकांची संख्या कमी करावी लागणार आहे. 

एन.व्ही रमना यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती

लढाईसाठी तैनात असलेल्या  सैन्याला (Army) आवश्यक  साधनांची पूर्तता करण्यासाठी  एक विशिष्ट दल काम करत असते. मात्र अत्याधुनिक आणि स्वयंचलित तंत्रज्ञानाच्या (Advance Technology) वापरामुळे सैन्यातील या दलाची आवश्यकता आता कमी झाली आहे. सैन्याच्या एखाद्या तुकडीत जर 120 लोक असतील तर अत्याधुनिक आणि स्वयंचलित तंत्रज्ञानामुळे त्याठिकाणी आता 80 सैनिक काम करू शकतात,असे उदाहरण सैन्याच्या अधिकाऱ्यांनी  समितीला दिले. ज्यामध्यमातून येणाऱ्या काळात सैनिकांच्या संख्येत कपात करावी  लागणार असल्याचे समजते आहे. 

संबंधित बातम्या