छत्तीसगडमध्ये आणखी एक हत्तीचा मृत्यू

Dainik Gomantak
शुक्रवार, 19 जून 2020

ज्याच्या घराशेजारी हत्ती आढळून आला त्याच्याकडे वन विभागाने चौकशी केली आहे,

रायगड

छत्तीसगडमधील रायगड जिल्ह्यातील बेहरामार गावात एक हत्ती मृतावस्थेत आढळून आला. राज्यात गेल्या दहा दिवसांत सहा हत्तींचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती वन अधिकाऱ्याने दिली आहे. बेहरामार गावातील एक घराच्या शेजारी गुरुवारी सकाळ हा हत्ती मृतावस्थेत आढळून आला. ज्याच्या घराशेजारी हत्ती आढळून आला त्याच्याकडे वन विभागाने चौकशी केली आहे, अशी माहिती विभागीय वन अधिकारी प्रियांका पांडे यांनी दिली. त्याच्या शवविच्छेदनानंतर त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजणार आहे. या प्रकरणाची कसून चौकशी केली जाणार आहे, असे त्यांनी सांगतले.
दरम्यान, बुधवारी विजेच्या धक्‍क्‍याने मृत्यू झालेल्या हत्तीच्या घटनेनंतर वीज वितरणच्या पाच कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती.

संबंधित बातम्या