Jammu Kashmir: अनंतनागमध्ये दहशतवादी अन् सुरक्षा दलांमध्ये चकमक, दोन दहशतवादी ठार

पोलीस आणि सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने परिसराला वेढा घातला आणि दहशतवाद्यांची शोधमोहीम सुरू केली
One terrorist neutralised in Anantnag encounter; Operation underway
One terrorist neutralised in Anantnag encounter; Operation underwayANI

जम्मू- काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात आज शुक्रवारी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली . काश्मीर झोन पोलिसांनी ही माहिती दिली आहे . दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम भागातील बटकूटच्या पूर्वेकडील श्रीचंद टॉप (वनक्षेत्र) येथे अजूनही चकमक सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. येथे दहशतवादी लपले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलीस आणि सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने परिसराला वेढा घातला आणि दहशतवाद्यांची शोधमोहीम सुरू केली. त्यानंतरच सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. (Anantnag Encounter Jammu Kashmir)

मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दल दहशतवाद्यांच्या ठिकाणी पोहोचताच दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. यानंतर चकमक सुरू झाली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिस, लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू केली होती. पथक दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणी पोहोचताच त्यांना पाहून ते घाबरले. आणि दहशतवाद्यांनी भारतीय जवानांच्या टीमवर गोळीबार सुरू केला. यानंतर सुरक्षा दलाच्या पथकानेही प्रत्युत्तर देत दहशतवाद्यांवर गोळीबार केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येथे दोन ते चार दहशतवादी लपून बसले आहेत.

One terrorist neutralised in Anantnag encounter; Operation underway
केरळमध्ये 'शिगेला'चा कहर, काहीही खाण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

बीएसएफला आंतरराष्ट्रीय सीमेवर बोगदा सापडला

त्याचवेळी सीमा सुरक्षा दलाला (BSF) गुरुवारी मोठे यश मिळाले आणि दहशतवाद्यांचा एक मोठा कट उधळून लावला. बीएसएफला जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर एक बोगदा सापडला. आगामी अमरनाथ यात्रा विस्कळीत करण्याचा पाकिस्तानी दहशतवाद्यांचा कट उधळून लावल्याचा दावा बीएसएफने केला आहे. या संदर्भात जम्मू भागात इशारा देण्यात आला होता. बीएसएफ अधिकाऱ्यांनी सांगितले की, बुधवारी संध्याकाळी सांबा जिल्ह्यातील चक फकिरा सीमा चौकी परिसरात 150 मीटर लांबीचा बोगदा सापडला.

One terrorist neutralised in Anantnag encounter; Operation underway
कर्मचाऱ्यांनो ऑफिसच्या कँटीनमध्येच जेवा स्वस्तात मस्त

आंतरराष्ट्रीय सीमेपासून 150 मीटर अंतरावर चमन खुर्द (फैज) या पाकिस्तानी चौकीसमोर नव्याने खोदलेला बोगदा शोधण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा बोगदा सीमा चौकी चक फकिरा पासून 300 मीटर अंतरावर आणि सीमेवरील भारताच्या शेवटच्या गावापासून 700 मीटर अंतरावर उघडत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com