वनप्लस स्मार्टवॉचमध्ये जीपीएस, 14 दिवसांची बॅटरी, कॉलिंगसह आहेत अनेक जबरदस्त फीचर्स

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 2 एप्रिल 2021

गेल्या महिन्यात  23 तारखेला, वनप्लसने आपल्या नवीन वनप्लस 9 सिरिजसह पहिला स्मार्टवॉच लॉन्च केला होता. या स्मार्टवॉचची किंमत भारतात 16,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. 

गेल्या महिन्यात  23 तारखेला, वनप्लसने आपल्या नवीन वनप्लस 9 सिरिजसह पहिला स्मार्टवॉच लॉन्च केला होता. या स्मार्टवॉचची किंमत भारतात 16,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.  मात्र, सध्या  देशात या स्मार्टवॉचची विक्री अद्याप सुरू झाली नसली तरी वनप्लसच्या अधिकृत वेबसाइटच्या यादीत या स्मार्टवॉचची किंमत 14,999  इतकी आहे.  सोबतच त्याची काही खास वैशिष्ट्येही देण्यात आली आहेत. 

वनप्लस वॉचमध्ये 1.39-इंच 326 पीपीआय एमोलेड डिस्प्ले आहे ज्यामध्ये 2.5 डी कर्व ग्लास आहे. तसेच, 4 जीबी स्टोरेजसह यात 46 मिमी स्टेनलेस स्टीलची केस असून यात इन-बिल्ट जीपीएस देण्यात आला आहे.  मात्र यूजर्सला फक्त 2 जीबी स्टोरेज वापरता येणार आहे. याशिवाय या स्मार्टवॉचमध्ये  500 गाणी लोड केली जाऊ शकतात, असा दावा कंपनीने केला आहे.  हे स्मार्टवॉच वायरलेस म्युजिक प्लेबॅकसाठी बर्‍याच ब्ल्यूटूथ इअरबड्ससोबत वापरता येऊ शकते. त्याचबरोबर या स्मार्टवॉचद्वारे वनप्लस टीव्हीवरही नियंत्रण ठेवता येते. त्याचबरोबर याचे आणखी एक फीचर्स म्हणजे तुम्ही टीव्ही पाहताना झोपी गेल्यास,  हे स्मार्टवॉच आपोआप टीव्ही बंद करेल.

WIvsSL: सामना कोणीही जिंको, या व्हिडिओनं क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली

सॉफ्टवेअरबद्दल बोलायचे झाल्यास वनप्लसने यात रियल टाइम ऑपरेशन सिस्टम (आरटीओएस) वापरला आहे. म्हणजेच तुम्हाला त्यात थर्ड पार्टी अ‍ॅप्सचा सपोर्ट मिळणार नाही.  वनप्लस वॉचमध्ये 402mAh बॅटरी दिलीअसून ती 14 दिवसंपर्यंत चालू शकते, असा दावा कंपनीने केला आहे.  केवळ 20 मिनिटांच्या चार्जिंगवर  हे स्मार्टवॉच आठवड्यातून चालतो. असेही कंपनीने म्हटले आहे.  तसेच, या घड्याळाला धूळ आणि पाण्यापासून बचावासाठी आयपी 68 आणि 5 एटीएम रेटिंग देण्यात आले आहे. 50 मीटर पाण्यात 10 मिनिटांसाठी हे घड्याळ देखील जगू शकते.

सौदीनं आफ्रिदीला केलं ओव्हरटेक, मलिंगाचा विक्रम मोडणार?

या वनप्लस वॉचमध्ये हार्ट रेट सेन्सर, एसपीओ 2 सेन्सर, स्ट्रेस डिटेक्शन, स्लीप मॉनिटरिंग आणि 110 वर्कआउट मोड यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. तसेच, याद्वारे, कॅलरी, अंतर, वेग आणि पोहणे कार्यक्षमता  ट्रॅक करू शकता, असा दावाही कंपनीने केला आहे. 

संबंधित बातम्या