कोरोनाविरोधातील लढाईला वेग; गेल्या सात दिवसातील आकडेवारी काय सांगते पाहा

दैनिक गोमन्तक
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

कोरोना विषाणूच्या विरोधात सुरु असलेल्या लढाई आता हळूहळू जोर पकडत असल्याचे दिसत आहे.

कोरोना विषाणूच्या विरोधात सुरु असलेल्या लढाई आता हळूहळू जोर पकडत असल्याचे दिसत आहे. मागील सात दिवसांमध्ये देशातील 188 जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी याबाबतची माहिती आज दिली आहे. याशिवाय सरकार मार्चमध्ये कोरोनाची लस 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना देण्याच्या स्थितीत पोहचणार असल्याचे डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे. 

तसेच देशात कोरोना विरुद्धच्या दोन लसी उपलब्ध असल्याची माहिती डॉ. हर्षवर्धन यांनी दिली. आणि आतापर्यंत 80 ते 85 लाख आरोग्य सेवक व कोरोनाच्या लढाईत आघाडीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात आल्याचे डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले. याशिवाय भारत जगातील 20 ते 25 देशांना कोरोनाची लस पोहचवण्याच्या स्थितीत पोहचला असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तर सध्याच्या स्थितीला भारतात कोरोनावरील 18 ते 20 लसींवर काम चालू असल्याचे डॉ. हर्षवर्धन यांनी अधोरेखित केले असून, यातील काही लसींना लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा केंद्र सरकारला जाहीर इशारा

याव्यतिरिक्त, कोरोनाविरुद्धच्या लढाईतील आघाडीच्या कर्मचार्‍यांपैकी 80-85 टक्के लसीकरण करण्यात आल्याचे आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले असून, 20 ते 25 देशांना कोरोनाची लस पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच 18 ते 20 लसी या प्रीक्लीनिकल, क्लिनिकल आणि ऍडव्हान्स स्टेज मध्ये असल्याची माहिती त्यांनी दिली. यानंतर, 'हेल्थ फॉर ऑल'चे स्वप्न जर जगात कधी पूर्ण झाले तर त्याचे मॉडेल भारतात विकसित होईल, असा विश्वास डॉ. हर्षवर्धन यांनी आज व्यक्त केला. 

यानंतर, मागील 28 दिवसांत देशातील 76 जिल्ह्यात कोरोनाचे एकही प्रकरण आढळले नसल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले. तसेच मागच्या 14 दिवसांमध्ये देशातील 34 जिल्ह्यांत एकही कोरोना संक्रमित सापडला नसल्याचे डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले. तर, गेल्या 21 दिवसांत 21 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे एकही रुग्ण आढळला नसल्याची माहिती त्यांनी पुढे दिली. आणि काल पर्यंत देशात 20,67,16,634 कोरोनाच्या चाचण्या घेण्यात आल्याचे डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले.        

   

संबंधित बातम्या