बिहारची जनता म्हणते.. सुशांतच्या मृत्यूचे केवळ राजकारण

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

 

सुशांतची आत्महत्या आणि त्याची चौकशी हा मुद्दा बिहारमधील निवडणुकीत प्रमुख होत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. सुशांतला न्याय देण्यासाठी सुरू झालेली सीबीआय चौकशी त्याला न्याय मिळवून दिल्यासाठीच आहे, असाही प्रचार केला जात आहे. 

नवी दिल्ली-  अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येवरून केवळ राजकारण होत असल्याचे बिहारमधील मतदारांचे मत आहे. बिहार विधानसभेच्या मतदानपूर्व सर्वेक्षणातून ही बाब समोर आली. या सर्वेक्षणानुसार भाजप-जदयू युती पुन्हा सत्तेत येईल, पण भाजपला जास्त जागा मिळतील, अशीही शक्‍यता वर्तवली आहे.

एबीपी व सी-व्होटरने घेतलेल्या मतदानपूर्व चाचणीत सुशांतच्या निधनावरून राजकारण सुरू असल्याचे मत ६२.४ टक्के लोकांनी व्यक्त केले आहे. मगध-भोजपूर, मिथिलांचल, सीमांचल आणि उत्तर बिहारमध्ये हा कौल ६२ टक्के आहे, तर पूर्व बिहारमध्ये ५३.४ टक्के. सुशांतची आत्महत्या आणि त्याची चौकशी हा मुद्दा बिहारमधील निवडणुकीत प्रमुख होत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. सुशांतला न्याय देण्यासाठी सुरू झालेली सीबीआय चौकशी त्याला न्याय मिळवून दिल्यासाठीच आहे, असाही प्रचार केला जात आहे. 

दरम्यान, याच सर्वेक्षणानुसार सत्ताधारी एनडीए आघाडीस १३५ ते १३९ जागा मिळतील. राज्यात सर्वाधिक ७३ ते ८२ जागा भारतीय जनता पक्ष जिंकले, तर नितीश कुमार यांचा जनता दल संयुक्तला ५९ ते ८७ जागा मिळतील.

संबंधित बातम्या