शबरीमला मंदिराचे दरवाजे १९ जानेवारीपर्यंत खुले

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 29 डिसेंबर 2020

मकराविलक्कु या वार्षिक उत्सवासाठी शबरीमला येथील मंदिर बुधवारी (ता.३०) खुले होणार आहे, अशी माहिती देवस्वम मंडळाने सोमवारी दिली. 

तिरुअनंतपुरम:  मकराविलक्कु या वार्षिक उत्सवासाठी शबरीमला येथील मंदिर बुधवारी (ता.३०) खुले होणार आहे, अशी माहिती देवस्वम मंडळाने सोमवारी दिली. भाविकांना गुरुवारपासून मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे. १९ जानेवारीपर्यंत दर्शन घेता येणार असून २० जानेवारीला मंदिराचे दरवाजे बंद होतील.

दर्शनासाठी ऑनलाइन आरक्षण आजपासून सुरू झाले आहे. कोरोनाच्या साथीमुळे दररोज पाच हजार भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे. भाविकांनी यात्रेच्या ४८ तास आधी कोरोना चाचणी करून ती निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र जवळ बाळगणे अनिवार्य आहे. ज्यांच्याकडे प्रमाणपत्र नसेल, त्यांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही. निलाक्कल येथे कोरोनाच्या चाचणीची सोय केलेली नसल्याचे मंदिर प्रशासनाने स्पष्ट केले.

संबंधित बातम्या