samudra-setu-mission
samudra-setu-mission

भारतीय नौदलाकडून 'ऑपरेशन समुद्र सेतू' पूर्ण

नवी दिल्ली,

देशभर असलेल्या कोविड - 19 साथीच्या काळात राष्ट्रीय पातळीवरील प्रयत्नातून परदेशातील भारतीय नागरिकांना समुद्रमार्गे स्वगृही परत आणण्याच्या मोहिमेने यशस्वीपणे 3,992 भारतीयांना देशात आणले आणि मोहीम समाप्त झाली. ही ऑपरेशन समुद्र सेतू मोहीम 5 मे 2020 रोजी सुरू करण्यात आली होती. सुमारे 55 दिवसांपेक्षा अधिक काळ चाललेल्या या मोहिमेत भारतीय नौदलाच्या जलाश्व (लँडिंग प्लॅटफॉर्म डॉक) आणि ऐरावत, शार्दूल आणि मगर (लँडिंग शिप टँक्स) या जहाजांनी भाग घेतला; सागरीमार्गे 23,000 किलोमीटरपेक्षा अधिक पल्ल्याचा प्रवास केला.

भारतीय नौदलाने यापूर्वी निर्वासन ऑपरेशनचा भाग म्हणून 2006 मध्ये ऑपरेशन सुकून (बेरिट) आणि  2015 मध्ये ऑपरेशन राहत (येमेन) यामध्ये भाग घेतला होता. 

बंदिस्त वातावरण आणि दबाव असलेली वायुविजन सुविधा यामुळे कोविड -19 च्या साथीचा जहाजांवर आणि समुद्रीवाहकांवर कोणताही महत्त्वपूर्ण परिणाम होऊ शकला नाही. अशा कठीण परिस्थितीतच भारतीय नौदलाने आपल्या व्यथित नागरिकांना परदेशातून बाहेर काढण्याचे आव्हान स्वीकारले.  नागरिकांना स्वगृही आणण्याच्या मोहिमेमध्ये या कार्यवाही दरम्यान जहाजांवर संसर्ग होण्याची कोणतीही घटना टाळणे, हे भारतीय नौदलासाठी सर्वांत मोठे आव्हान होते. कठोर उपायांची अंमलबजावणी आणि नियोजन, जहाजांच्या वातावरणास विशिष्ट असे वैद्यकीय सुरक्षा नियम लागू करण्यात आले. या सगळ्या गोष्टी ऑपरेशन समुद्र सेतूमध्ये काटेकोरपणे पाळण्यात आल्यामुळे आपल्या 3,992 नागरिकांना सुरक्षितपणे परत मायदेशी आणण्यात आले.

ऑपरेशन समुद्र सेतू या मोहिमेसाठी भारतीय नौदलाची जहाजे उत्तम प्रकारे वापरण्यात आली. कोविड - 19 संबंधित शारीरिक अंतरांच्या मानदंडानुसार वैद्यकीय व्यवस्था, भोजन व्यवस्था आणि प्रवासी वाहून नेण्याची क्षमताही योग्य होती. मोहिमेसाठी वापरल्या जाणाऱ्या जहाजाची खास तरतूद करण्यात आली होती. जहाजावरच कोविड - 19 संबंधी विशेष वैद्यकीय उपकरणांची देखील तरतूद करण्यात आली होती. महिला अधिकारी आणि सैन्याचे शुश्रुषा कर्मचारी देखील महिला प्रवाशांच्या सेवेसाठी कटिबद्ध होते. मायदेशी परतणाऱ्या सर्व प्रवाशांना मूलभूत सुविधा आणि वैद्यकीय सुविधा जहाजावरच पुरविण्यात आल्या होत्या. आंतरराष्ट्रीय मातृदिनी कोची येथे पोहोचल्यानंतर काही तासांतच जलाश्व जहाजावरून मार्गक्रमण करणाऱ्या गर्भवती श्रीमती सोनिया जेकब यांनी मुलाला जन्म दिला.

भारतीय नौदलाच्या जहाजांनी ऑपरेशन समुद्र सेतू दरम्यान जलाश्व, ऐरावत, शार्दूल, आणि मगर या जहाजांनी सुमारे 23,000 पेक्षा अधिक किलोमीटरचा प्रवास समन्वय राखत पूर्ण केला.

याची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे -

इतर सरकारी संस्थांबरोबरच भारतीय नौदल देखील आपल्या नागरिकांना मदत करण्याच्या राष्ट्रीय प्रयत्नांमध्ये आघाडीवर आहे. देशभरात कोविड - 19 संबंधिचे वैद्यकीय साहित्य, उपकरणे आणि डॉक्टर यांची ने - आण करण्यासाठी भारतीय नौदलाची आयएल - 38 आणि डॉर्नियर या विमानांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांनी देखील काही उपकरणे शोधून काढले जसे की, स्वसंरक्षक उपकरण (नवरक्षक), हँड- हेल्ट टेम्प्रेचर सेन्सर, सहायक श्वसन यंत्रणा, 3- डी प्रिंटेड फेस शिल्ड, पोर्टेबल मल्टी फीड ऑक्सिजन मॅनिफोल्ड, व्हेंटिलेटर्स, एअर - इव्हॅक्युएशन स्ट्रेचर पॉड, जंतूनाशके इत्यादी. ऑपरेशन समुद्र सेतू अंतर्गत ही उपकरणे जहाजांवर प्रत्यक्षात नेण्यात आली आणि यजमान देशांना तेथून निर्वासन कार्य करण्यासाठी काही उपकरणे पुरवण्यात आली.

भारतीय नौदलाने ऑपरेशन समुद्र सेतू अंतर्गत उभयचर पद्धतीच्या सागरी उद्वाहक बसविल्या जेणेकरून बहुआयामी लवचिक पद्धतीचा प्लटफॉर्म उपलब्ध झाला. जेव्हा जलाश्व, मगर, ऐरावत आणि शार्दूल हे ऑपरेशन समुद्र सेतूसाठी घेण्यात आले, शिवाय आणखी एक लँडिंग शिप असलेले 'केसरी'ने मिशन सागर हे हाती घेतले, 580 टन अन्नाची मदत, आयुर्वेदिक औषधांसह अन्य औषधे मालदीव येथे, मॉरिशस, मादागास्कर, कोमोरोस बेट आणि सेशल्समध्ये देण्यात आले. या मोहिमेचा एक भाग म्हणून मॉरिशस आणि कोमोरोस बेट येथे वैद्यकीय पथकही तैनात करण्यात आले होते.

ऑपरेशन समुद्र सेतू दरम्यान निर्वासित झालेल्या 3,992 भारतीय नागरिकांना विविध बंदरांवर उतरविण्यात आले आणि संबंधित राज्य अधिकाऱ्यांच्या देखरेखीत सोपविण्यात आले. ही मोहीम भारतीय नौदलाने परराष्ट्र, गृहमंत्रालय, आरोग्य आणि भारत सरकार, तसेच राज्य सरकारच्या इतर विविध विभागांसमवेत समन्वयाने करण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com