कृषी विधेयके फेटाळून लावा

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

कृषी सुधारणा विधेयके संसदेत गदारोळामध्येच मंजूर करण्यात आली असल्याने राष्ट्रपतींनी त्यांना मान्यता देऊ नये, तसेच ती  सरकारकडे परत पाठवावीत, अशी विनंती आज अठरा विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली. विरोधी पक्षाच्या नेत्यांचे हे शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटले

नवी दिल्ली: कृषी सुधारणा विधेयके संसदेत गदारोळामध्येच मंजूर करण्यात आली असल्याने राष्ट्रपतींनी त्यांना मान्यता देऊ नये, तसेच ती  सरकारकडे परत पाठवावीत, अशी विनंती आज अठरा विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली. विरोधी पक्षाच्या नेत्यांचे हे शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटले.

मागील तीन दिवसांपासून संसदेत कृषी सुधारणा विधेयकांवरून वातावरण तापले असून विरोधी पक्षांच्या बहिष्कारात आज राज्यसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित झाल्यानंतर काँग्रेस, द्रमुक, डावे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, आम आदमी पक्ष यांच्यासह अठरा समविचारी विरोधी पक्षीय नेत्यांच्या सह्या असलेले निवेदन राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी राष्ट्रपतींना सादर केले. शिवसेनेनेही या निवेदनावर सही करून विरोधकांच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. 

संबंधित बातम्या