Opposition Unity: राष्ट्रवादीच्या फुटीचे देशभर पडसाद; विरोधी पक्षांची बैठक पुढे ढकलली

Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजीनंतर आता विरोधी ऐक्यालाही धोका निर्माण झाला आहे.
Opposition Unity
Opposition UnityDainik Gomantak

Opposition Meeting Postponed after NCP Rift: राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजीनंतर आता विरोधी ऐक्यालाही धोका निर्माण झाला आहे. पाटण्यानंतर आता बंगळुरूमध्ये होणारी विरोधकांची बैठकही संसदेच्या अधिवेशनापर्यंत स्थगित करण्यात आली आहे.

या ऐक्याचा प्रमुख चेहरा मानल्या जाणाऱ्या शरद पवार यांच्या पक्षाच्या समावेशावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने विरोधी एकजुटीलाही मोठा फटका बसला आहे.

13 आणि 14 जुलै रोजी होणार होती बैठक

भाजपेतर विरोधी पक्षांची दुसरी बैठक अखेर पुढे ढकलण्यात आली आहे. 13 आणि 14 जुलै रोजी बेंगळुरू येथे बैठक प्रस्तावित होती.

बैठकीची पुढील तारीख अद्याप ठरलेली नाही. जेडीयूचे मुख्य प्रवक्ते केसी त्यागी यांनी सांगितले की, संसदेच्या पावसाळी अधिवेशनानंतर विरोधी पक्षांची पुढील बैठक बोलावली जाण्याची शक्यता आहे.

संसदेचे पावसाळी अधिवेशन यावर्षी 20 जुलैपासून सुरू होऊन 20 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.

माहितीनुसार, प्रस्तावित बेंगळुरूची बैठक मुख्यत्वे बिहार विधानसभेचे आगामी पावसाळी अधिवेशन (10 ते 14 जुलै) आणि कर्नाटक विधानसभेचे अर्थसंकल्पीय आणि पावसाळी अधिवेशन (3 ते 14 जुलै) यामुळे पुढे ढकलण्यात आली असावी असेही सुत्रांनी सांगितले.

Opposition Unity
Ajit Pawar: अजित पवारांसह 9 जणांविरुद्ध राष्ट्रवादीकडून अपात्रतेची याचिका

काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल

महाराष्ट्रातील कालच्या घडामोडींवर काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल म्हणाले, "महाराष्ट्र सरकार हे भ्रष्टाचार आणि पापाचे प्रोडक्ट आहे. जनतेने महाराष्ट्रातील भ्रष्ट आणि तडजोड करणाऱ्या नेत्यांना चांगलेच ओळखले आहे आणि या प्रत्येकाला पुढील निवडणुकीत त्यांच्या आयुष्यभराचा धडा शिकवला जाईल."

भाजपचे वॉशिंग मशीन पुन्हा कामाला लागले आहे हे स्पष्ट आहे. महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीत सामील झालेल्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. "ईडी, सीबीआय आणि आयकर अधिकारी त्यांच्या मागे लागले होते. आता या सर्वांना क्लीन चिट मिळाली आहे."
जयराम रमेश, काँग्रेसचे सरचिटणीस

एकीकडे पंतप्रधान मोदींच्या विरोधात देशभरातील विरोधकांना एकजूट करण्यात शरद पवारांची मोठी भूमिका होती, पण महाराष्ट्रातील आपल्या बालेकिल्ल्यात ते पक्षाला एकत्र ठेवू शकले नाहीत. या घडामोडीनंतर विरोधी पक्षनेत्यांनी शरद पवारांना फोन करुन समर्थन दर्शवत आहेत.

काँग्रेस संसदीय समितीच्या प्रमुख सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शरद पवारांना फोन करून पाठिंबा दिला.

Opposition Unity
Sharad Pawar Live : शरद पवारांची पत्रकार परिषद Ajit Pawar | NCP | Ajit Pawar Oath | Ajit Pawar Rebel

अजित पवारांनी बंडखोरी करून शिंदे सरकारमध्ये सामील झाल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली, ज्यात त्यांनी सांगितले की, त्यांना देशभरातील नेत्यांकडून समर्थनासाठी फोन येत आहेत.

आज जे घडले त्याची मला चिंता नाही. मला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा फोन आला आणि त्यांनी मला पाठिंबा दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com