Monsoon Update: केरळमधील 'या' 6 जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट'

अंदमान (Andaman) समुद्रातील भागात कमी दाबाचे पट्टे तयार होण्याची शक्यता आहे आणि ते 15 नोव्हेंबरपर्यंत बंगालच्या (Bengal) उपसागरावर मध्य पूर्वेपर्यंत पोहोचतील.
Monsoon Update: केरळमधील 'या' 6 जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट'
Rain `Dainik Gomantak

केरळ (Kerala) मधील विविध भागात शनिवारी रात्रीपासून मुसळधार पावसाला (Rain) सुरुवात झाली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे केरळच्या काही ठिकणी शनिवारी भूस्खलन झाले आहे. तसेच रेल्वे सेवाही (Railway service) पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. सोमवारी विविध ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यभरातील होणाऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर 6 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

हवामान खात्याने एर्नाकुलम, इडुक्की, त्रिशूर, कोझिकोड, कन्नूर आणि कासारगोड या जिल्ह्यांमध्ये पावशाची शक्यता वर्तली आहे. शिवाय, IMD ने मंगळवरी 8 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. IMD ने रविवारी केरळमधील एर्नाकुलम, इडुक्की आणि त्रिशूर या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जाहीर केला होता. राज्याची राजधानी तिरुअनंतपुरम तसेच कोल्लम, पठाणमथिट्टा, अलाप्पुझा, एर्नाकुलम आणि कासारगोडसह केरळच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

या भागात अति मुसळधार पावसाची शक्यता:

IMD च्या माहितीनुसार , तिरुवनंतपुरममध्ये अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोल्लम, पठानमथिट्टा, अलाप्पुझा, कोट्टायम आणि इडुक्की जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. IMD ने सांगितले की, 16 नोव्हेंबरपर्यंत राज्यात एक किंवा दोन ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मुख्यमंत्री पिनराई विजयन याबाबत म्हणाले की, अतिवृष्टी पाहता भूस्खलन आणि पूरप्रवण भागात आपत्कालीन मदत शिबिरे राबवली जातील. पुढे बोलताना ते म्हणाले की, दक्षिणेकडील राज्यात पश्चिमेकडील वारे वाढत आहेत. तिरुअनंतपुरम आणि कोल्लम जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची स्थिती कायम राहिल असे पिनराई विजयन म्हणाले.

पुढील दोन आठवडे पावसाची शक्यता:

पुढे बोलताना विजयन म्हणाले, येत्या काही तासांत अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे उंच पर्वतीय भागात, नदीकाठच्या आणि पर्यटन भागात सावधगिरी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एक अहवालानुसार पुढील 12 तासांत बंगालचा उपसागर, यूएस मधील अंदमान समुद्रातील भागात कमी दाबाचे पट्टे तयार होण्याची शक्यता आहे आणि ते 15 नोव्हेंबरपर्यंत बंगालच्या उपसागरावर मध्य पूर्वेपर्यंत पोहोचतील. तसेच अत्यंत कमी दाब या भागात होण्याची शक्यता आहे. IMD च्या अंदाजानुसार मुख्यमंत्री असे म्हणाले. केरळमध्ये येत्या दोन आठवड्यांत म्हणजे 25 नोव्हेंबरपर्यंत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com